जांभुळघाट नेरी रोडवर भीषण अपघात
बंडू मडावी तलाठी किरकोळ जखमी तर चार पाच वर्षाचा मुलां सह एक महिला सहकारी गंभीर जखमी
चिमूर,(राज्य रिपोर्टर) : जांभुळघाट नेरी रोडवर भीषण अपघात झाला असून यामध्ये तलाठी बंडू मडावी सह त्यांचा सहा वर्षाचा मुलगा व एक त्यांच्यासोबत असणारी महिला गंभीररीत्या जखमी झाले आहेत, तलाठी बंधू मडावी यांच्या लहान मुलाला उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे हलवण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की तलाठी बंडू मडावी आपल्या वैयक्तिक चारचाकी वाहनाने नेरी ला जात होते, नेरी वरून सुसाट वेगाने येणाऱ्या भाजीपाला वाहक गाडीने धडक दिली, या अपघातात तलाठी बंडू मडावी किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्या सहा वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झालेला आहे.
मुलांची परिस्थिती अत्यंत नाजूक असून नेरी रोड वरील जंगल परिसरात असणाऱ्या टेकडीजवळ हा भीषण अपघात झाला आहे



0 Comments