वढा येथे रेती तस्करांचा धुमाकुळ सुरु
उत्खनन अधिकारी म्हणुन महिलेने अवैध रेती तस्करांकडून उखडली पैश्याची मोठी रक्कम
तथाकथित महिलेच्या पैश्याच्या देवान घेवाणीचा व्हिडिओ समाज माध्यमात वायरल
घुग्घुस,(राज्य रिपोर्टर) हनिफ शेख : उत्खनन अधिकारी असल्याची सांगुन रेती तस्करांकङून पैशाची देवाण घेवाण करणा-या एका महिलेलेचा व्हिडिओ वायरल झाला असून, वसुलीची मोठी रक्कम घेतल्याची बातमी पुढे आली आहे.
घुग्घुस परिसरातील रेती तस्करांनी आपला मोर्चा वढा नदीच्या रेती घाटांवर वळविला आहे. घुग्घुस येथुन जवळच असलेल्या वढा गावाच्या रेती घाटांवरुन अवैध रेती तस्करी ट्रॅक्टर ट्राली द्वारे सुरु आहे.
हिच संधी साधुन एका महिलेने स्काॅर्पीओ क्रमांक एमएच ३४ बीएफ ४४४९ मध्ये तिन इसमांना सोबत घेऊन वढा गावात दाखल होऊन त्यांनी गावचे पोलीस पाटील किसन वरारकर यांना भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधला व आम्ही उत्खनन विभागातुन आलो आहे, असे सांगितले. पोलीस पाटील येताच
त्यांच्या सोबत रेता वाटांवर जाऊन एक ट्रॅक्टर पकडले व त्यालाही तेच सांगुन ट्रॅक्टर लावण्याची धमकी दिली. तेव्हा मोबीन खान, नविन सिंग व नबी भाई यांनी मध्यस्थी केली. त्या ट्रॅक्टर धारकाकडुन हजारों रुपयाची मोठी रक्कम वसुल करुन तथाकथितांनी पोबारा केला.
मात्र या घडलेल्या नाट्याची चर्चा घुग्घुस येथे पसरताच खळबळ उडाली.
"भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक अल्का खेडकर यांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी जिल्हा अधिकारी चंद्रपुर व जिल्हा उत्खनन अधिकारी यांना माहिती दिली. त्यांचे आदेश मिळताच लवकरच तथाकथित एका महिलेची व तिच्या तिन सहकारी विरुद्ध पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी भ्रमणध्वनीवर दिली
वढा नदीच्या पात्रा तुन हजारो ब्रास रेती चोरीस गेल्याने शासनाच्या लाखो रुपयाचा महसुल पाण्यात बुडाला आहे. रेती तस्करांनी गजानन वरारकर यांच्या शेतात मोठे रेतीचे साठे तयार करुन ठेवले आहे.
वढ्याचे उपसरपंच संतोष भोस्कर यांनी हजारो ब्रास रेती चोरीस गेल्याने गावातून होणारी रेती तस्करी बंद करण्याची मागणी केली आहे.
[6/22, 8:55 PM] Nawshad Shek Ghugus: हनिफ शेख, घुग्घुस प्रतिनिधी



0 Comments