युवासेनेतर्फे मराठवाडा पदवीधर मतदार नोंदणी अभियानास पुनश्च प्रारंभ


युवासेनेतर्फे मराठवाडा पदवीधर मतदार नोंदणी अभियानास पुनश्च प्रारंभ

औरंगाबाद, (राज्य रिपोर्टर) : संभाजीनगर येथील युवासेना शहर सचिव अक्षय खेडकर गेल्या अनेक दिवसापासून पदवीधर मतदान नोंदणी करत आहेत पण या  संचारबंदी च्या काळामध्ये पदवीधर निवडणूका पुढे ढकलण्याच्या मार्गावर आहे त्यामुळेच निवडणूक आयोगाने परत ऑनलाइन पद्धतीने मतदार नोंदणी सुरू केली आहे 
कोणीही मतदार मतदान नोंदणी करण्यापासून पासून वंचित राहिले असेल तर तो परत नोंदणी करू शक्ती तोही online पद्धतीने तसेच त्यांनी खाली दिलेल्या वेबसाईट वर
https://ceo.maharashtra.gov.in/GOnline/Graduate19.aspx संपर्क साधावा असे आव्हान अक्षय खेडकर यांनी युवासेनेच्या माध्यमातून केले आहे.
आज  गेल्या कित्येक वर्षापासून पदवीधर मतदारसंघ मध्ये मतदानाची टक्केवारी खूप कमी प्रमाणात होत आहे पण यावर्षी निवडणूक आयोगाने व युवासेनेच्या माध्यमातून अक्षय खेडकर यांनी मराठवाड्यातील सर्व तरुणांमध्ये सोशल मीडियाच्या, कॉल सेंटरच्या, न्यूज पेपर व इतर माध्यमातून पदवीधर मतदान व  मतदारसंघाचे महत्व समजण्यात काम केले आहे  त्यामुळे या होणाऱ्या निवडणुकीमध्ये तरुणांचा टक्केवारी जास्तीतच जास्त प्रमाणात असल्यामुळे मराठवाड्यातील सर्व तरुण पदवीधर मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे व त्या तरुण मतदारांचा ओढा हा तरुण व उच्च शिक्षित उमेदवार कडे  राहील असे सर्वांना वाटत आहे त्यामुळे युवा सेनेचे अक्षय खेडकर यांनी असे आव्हान केले आहे की अत्ता पर्यंत या मतदार संघात शिवसेना चा उमेदवार उभा सुद्धा राहिला नाही त्यामुळे आपण या मतदार संघात शिवसेनेचे संघटन मजबुत करूयात जेणेकरून विद्यार्थ्यांना मध्ये शिवसेना विद्यार्थ्यांना चे प्रश्न किती सोडवते हे सर्व मराठवाड्यातिल मुलानं संदेश मिळेल तसेच  या वेळेस युवासेना च्या माध्यमातून  जास्तीत जास्त संख्येने तरुण पदवीधरांनी मतदान नोंदणी केली आहे व जे कोणी या पासून वंचित राहिले असतील तर यासाठी निवडणूक आयोगाने ऑनलाईन पद्धतीने  मतदार नोंदणी सुरू केली आहे त्याची सुद्धा जनजागृती युवासेना चे अक्षय खेडकर हे करत आहेत तसेच  मतदान नोंदणी सुद्धा मोठया प्रमाणात केली आहे व  करणार ही आहेत.
या नवीन मतदान नोंदणी चा सुद्धा फायदा तरुण वर्ग घेईल व आपला मतदानाचा हक्क बजावेल अशी चर्चा विद्यार्थ्यांना मध्ये आहे
या मतदान नोंदणी प्रक्रियेत कोणालाही काही समस्या असेल तर युवासेना च्या माध्यमातून हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात अला आहे तसेच त्याचा मोबाईल क्रमांक 8983019999 असा आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनि या मतदार नाव नोंदणीत जास्तीच जास्त प्रमाणात सहभागी व्हावे तसेच काही अडचण असल्यास हेल्पलाईन ला कॉल करावा आपली समस्या सोडवली जाईल ही खात्री देतो


Post a Comment

0 Comments