कोरोना लढ्यातील योध्यांना प्रोटीन किटचे वाटप
खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या पुढाकर
चंद्रपूर (राज्य रिपोर्टर): कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले. जनतेला उत्तम आरोग्य सेवा देण्याचे कार्य डॉक्टर, परिचारिका हे करीत आहेत. यांच्या आरोग्याची काळजी घेणे देखील समाजातील प्रत्येक व्यक्तीचे काम असल्याचे मत खासदार बाळू धानोरकर यांनी केले. आज खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथील डॉक्टर, परिचारिका यांना प्रोटीन किटचे वाटप करण्यात आले.
सध्या देशात तसेच राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढत आहे. या संकटाच्या सामना करीत ढाल म्हणून डॉक्टर, परिचारिका उभे असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. परंतु वेळ मिळत नसल्यामुळे त्यांना कुटुंबाला व स्वतःला वेळ देता येत नाही. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या प्रश्न देखील निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे आज खासदार बाळू धानोरकर , आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी स्वतः भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन येथील डॉक्टर, परिचारिका याना प्रोटीन किट्स चे वाटप केले. यावेळी डॉक्टर, परिचारिका यांचे देखील मनोबल वाढल्याचे दिसून आले. यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी हा लढा पुढे असाच एक होऊन लढू असे सांगून सर्वांचे मनोबल वाढविले. यावेळी नागराध्यक्ष अनिल धानोरकर, मुख्याधिकारी बन्नोरे, उपाध्यक्ष प्रफुल चटकी, नगरसेवक चंद्रकांत खारकर, विनोद वानखेडे व ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथील डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी यांची उपस्थिती होती.



0 Comments