राजुरा चे रेल्वे पुलावर अपघात एक जगीच ठार एक गंभीर जखमी

राजुरा चे रेल्वे पुलावर अपघात एक जगीच ठार एक गंभीर जखमी

राजुरा,(राज्य रिपोर्टर)राकेश कलेगुरवार : राजुरा बल्लारपूर मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ अज्ञात वाहनाने धडकेत अपघात   झाल्याची घटना आज  मंगळवार ला घडली.

 या अपघात निलेश मनोहर कोरेवार हे जागीच ठार झाले असून शांताराम जुमनाके हे जखमी झाले आहे.
चंद्रपूर जिल्हा सहकारी संस्था मर्यादित चंद्रपूर येथे गट सचिव म्हणून कार्यरत असलेले निलेश कोरेवार आणि शांताराम जुमनाके दुचाकीने बल्लारपूर कडे जात असल्याचे समजते दरम्यान उड्डाणपुलाजवळ अज्ञात वाहनाची जबर धडक बसली यात निलेश कोरेवार याचा  जागीच मृत्यू झाला तर शांताराम जुमनाके जखमी झाले माहित होतच राजुरा पोलीस घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून शांताराम जुमनाके या जखमेला राजुरा ग्रामीण रुग्णालयात भरती केले असून मृतकाचे शवविच्छेदनात नेण्यात आले आहे पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.


Post a Comment

0 Comments