बल्लारपुरात अवैध बांधकाम जोरात : अनेक ठिकाणी बांधकाम साहित्याचा स्टॉक


बल्लारपुरात अवैध बांधकाम जोरात : अनेक ठिकाणी बांधकाम साहित्याचा स्टॉक           
 बल्लारपुर (राज्य रिपोर्टर) : संपूर्ण देशभरात कोरोनाचा धूमाकूळ सुरु असतांना तसेच संपूर्ण मानवसमाज लॉकडाउन असतांना सुध्दा शहरात मात्र वेगळेच चित्र निर्माण होत असल्याचे दिसत आहे शहराच्या अनेक भागात अवैध बांधकाम जोरात सुरु असल्याचे दिसून येत आहे.

 शांसनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक शासकीय कामाना जरी स्थगिति दिली असली तरी अनेक बांधकाम व्यावसायिक मात्र धड़ाक्याने बांधकाम करीत असल्याचे दिसते याही स्थितित बांधकाम करतांना अनेक नागरिक मात्र नियमाचे पालन करतांना दिसून येत नाही बांधकाम करतांना प्रत्येक नागरिकांनी बांधकाम करतांना शहर विकासाच्या दृष्टिने आपल्या चटाई क्षेत्रात बांधकाम करणे अपेक्षित आहे मात्र अनेक ठिकाणी रोड ला लागुनच बांधकाम करीत असल्याचे दिसून येते शिवाय काही ठिकाणी मोठमोठी व्यापारी संकुल उभी होत असतांना पार्किगची सोय असने अपेक्षित आहे मात्र याही ठिकाणी सम्बंधित बांधकाम करणारे संपूर्ण जागेत बांधकाम करतांना दिसतात. त्यामुळे नागरिकांना आपली वाहने रस्त्यावर उभी करावी लागतात                           बल्लारपुर शहराचा विचार केला तर आज शहरात अशी अनेक व्यापारी संकुल आहेत जिथे पार्किंगची सोय उपलब्ध नाही त्यामुळे रस्त्याने आवागमन करतांना नागरिकांना समस्याचा सामना करावा लागतो याशिवाय संपूर्ण देशभरात लॉकडाउन सुरु असतांना अनेक नागरिकांना आर्थिक टँचाई ची स्थिति असतांना सुध्दा अवैध बांधकाम मात्र जोरात सुरु आहे मध्यंतरीच्या काळात रेतीवर बंदी असतांना सुध्दा बल्लारपुरात सहज रेती उपलब्ध होत असल्याचे चित्र होते याशिवाय कोणतेही बांधकाम करताना प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक असते मात्र अनेक ठिकाणी मात्र स्वमर्जिने बांधकाम होत असल्याचे चित्र आहे म्हणून प्रत्येक नागरिकांनी आपली नैतिक जबाबदारी म्हणून कोणतेही बांधकाम करतांना शहर विकासाच्या दृष्टिकोनातूनच आपले बांधकाम करावे तसेच व्यावसायिक स्तरावर बांधकाम होत असल्यास प्रशासनानी होत असलेले बांधकाम नियमानुसार तसेच ठरलेल्या निकषानुसार होत आहे की नाही यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाने सुध्दा पार पाळने अपेक्षित आहे त्यामुळे होत असलेल्या अवैध बाँधकामावर नियंत्रण आणता येईल.

Post a Comment

0 Comments