चित्रपट अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांची आपल्या राहते घरी आत्महत्या


चित्रपट अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांची आपल्या राहते घरी आत्महत्या                                   
 मुंबई (राज्य रिपोर्टर) : वयाच्या 34 व्या वर्षी आपल्या आयुष्यात यशोशिखर गाठणाऱ्या व पवित्र रिश्ता या झी टीव्ही वरील मालिकेतुन मानव ची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेल्या तसेच छिछोरे या हिंदी चित्रपटातुन लूझर्स मधून अशक्यप्राय विनर्स पर्यंत पोहोचवीणारे मात्र आपल्या आयुष्यात मात्र लूझर्स ठरले महत्वाचे म्हणजे महेन्द्रसिंग धोनी या चित्रपटात महेन्द्रसिंग धोनीची भूमिका पार पाडुन लोकप्रिय ठरला. मात्र वयाच्या 34 व्या वर्षी सुशांतसिंग राजपूत यांनी आपल्या राहते घरी आत्महत्या केल्याची माहिती आहे सूत्राच्या माहितीनुसार सुशांतसिंग राजपूत हे मागील काही दिवसांपासून डिप्रेशन(तनावग्रस्त) जीवन जगत असल्याची माहिती आहे तसेच यासम्बंधिची तो ओषधी ही घेत असल्याची माहिती आहे यामुळे चित्रपट अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांनी मुंबईच्या बान्द्रा स्थित निवासस्थानी आज दुपारच्या सुमारास गळफास घेवून आत्महत्या केल्याची माहिती आहे सुशांतसिंग मूळचा बिहार राज्यातील असून सुरुवातीला नाट्य क्षेत्रात भूमिका पार पाडल्यानंतर चित्रपट सृष्टित दाखल झाला व आपल्या अभिनयाच्या बळावर एक वेगळे स्थान निर्माण केले सुशांतसिंग राजपूत यांच्या अकाली मृत्यु मुळे चित्रपट सृष्टितील अनेक नट नट्यानी आदरांजली अर्पण केली असून सुशांतसिंग राजपूत यांनी आत्महत्या का केली यासंबंधिचा पुढील तपास मुंबई पोलिस करीत आहे.

Post a Comment

0 Comments