पोलिस कर्मचारी हे खरे कोरोना योध्दे – हरिश शर्मा
अहेरी पोलिस स्टेशनमधील पोलिस कर्मचा-यांना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वतीने सुरक्षा किटचे वितरण
चंद्रपूर, (राज्य रिपोर्टर) : माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्हयातील अहेरी येथील पोलिस स्टेशनमध्ये 57 पोलिस कर्मचा-यांना सुरक्षा किटचे वितरण करण्यात आले. कोरोना महामारीच्या जागतीक संकटाशी देश लढत असताना आपण आपल्या परीने समाजाच्या सुरक्षेसाठी योगदान द्यावे या भावनेतुन आ. मुनगंटीवार यांनी सर्वच घटकांना आवश्यक मदत करण्याचे काम सुरु ठेवले आहे. पोलिस कर्मचारी हे खरे कोरोना योध्दे आहे. ते समाजाची काळजी घेतात, त्यांची काळजी घेणे हे समाजाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन हरिश शर्मा यांनी यावेळी बोलताना केले.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने पोलिस बांधवांना सुरक्षा किटचे वितरण करण्यात येत आहे. अहेरी पोलिस स्टेशनमधील काही पोलिस कर्मचा-यांनी भाजपाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा यांच्याकडे सुरक्षा किट उपलब्ध होण्याची मागणी केली. सदर मागणी हरिश शर्मा यांनी आ. मुनगंटीवार यांच्या समोर ठेवताच त्यांनी ती तात्काळ मान्य केली व भाजपाच्या पदाधिका-यांनी अहेरी पोलिस स्टेशनमध्ये जावुन पोलिस कर्मचा-यांना सुरक्षा किटचे वितरण केले.
यावेळी पोलिस निरिक्षक प्रविण ढगे, भाजपाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, गडचिरोली जिल्हा भाजपाचे सचिव संदिप कोरेत, मुकेश नामेवार, सुर्यकांत ठाकरे, रवी नेलनुट्टी, संतोष मद्दीवार, संतोष जोशी, श्रीनिवास सहारे, दिलीप पडगेलवार, नारायण सिडाम, राकेश बिरदु, अमोल गुडेल्लीवार, कमलताई पडगेलवार, डॉ. मंगेश गुलवाडे, दत्तप्रसन्न महादाणी, छगन जुलमे, मुन्ना ठाकुर, मनिष पोलशेट्टीवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी सोशल डिस्टंसिंगचे पालन करत पोलिस कर्मचा-यांना सुरक्षा किट वितरीत करण्यात आल्या.




0 Comments