वेळीच चांगला उपचार मिळाला असता तर त्याचा जिव वाचला असता


वेळीच चांगला उपचार मिळाला असता तर त्याचा जिव वाचला असता

चंद्रपूर,(राज्य रिपोर्टर) : चंद्रपूर गुरवारला ११:३० वाजता महाकाली काॅलरी भुमिगत कोळसा खाणीत कामावर असतांना अविनाश ठावरी (३९) रा. महाकाली काॅलरी,चंद्रपुर यांच्या खाणीच्या आतील कोळश्याचे मोठे ढेले अंगावर पडल्याने ते किरकोड जख्मी झाले.

त्यांना खाणीच्या आतील भागातुन तब्बल दिड तासानंतर १ वाजता बाहेर काढण्यात आले व ४ वाजता लालपेठ एरीया हाॅस्पिटल येथे उपचारा साठी भर्ती करण्यात आले.परंतु रात्री ८ वाजता दरम्यान त्यांचा तिथे मृत्यु झाला.
वेळीच चांगला उपचार मिळाला असता तर त्याचा जिव वाचला असता. परंतु चांगला वैद्यकीय उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यु झाला असा आरोप त्यांच्या कुटुंबीयानी व कामगार संघटनांनी महाकाली काॅलरी भुमिगत कोळसा खाणीच्या व्यवस्थापनावर लावला आहे.

Post a Comment

0 Comments