समाजातील प्रत्येक महिलेने समाजाचे नेतृत्व करण्याची गरज : आमदार प्रतिभाताई धानोरकर
राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक किटचे वाटप
वरोरा (राज्य रिपोर्टर) : समाजात अनेक प्रश्न असतात. मात्र ते सोडविणे गरजेचे असते. महिलांना समस्यांची जाण असते. परंतु मनात नृनगंड असल्यामुळे त्या पुढे येत नाही. त्यामुळे समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी महिलांनी नेतृत्व करण्याची गरज आहे. असे मत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केले. त्या अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे माजी अध्यक्ष व खासदार राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त वरोरा - भद्रावती विधानसभा क्षेत्रात जीवनावश्यक वस्तूची किट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.
कुटुंबातील प्रत्येक प्रश्नांची जाण महिलेला असते. महिला कुटुंबातील प्रत्येक प्रश्नाला सोडविण्यासाठी त्या पुढाकार घेत असतात. त्याच प्रमाणे त्यांनी समाजात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष नेतृत्व केल्यास समाजातील अनेक प्रश्न त्यांच्या माध्यमातून सुटू शकतात. त्यामुळे महिलांनी पुढे यावे असे आवाहन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे माजी अध्यक्ष व खासदार राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मालवीय वॉर्ड वरोरा, भद्रावती येथील किलोंनी, चेकबरांज तसेच इतर ठिकाणी देखील जीवनावश्यक किटचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, शहर अध्यक्ष विलास टिपले, तालुका अध्यक्ष मिलिंद भोयर ,गटनेते गजानन मेश्राम ,प.स.सभापती धोपटे, संजीवनी भोयर, राजू महाजन , नगरसेवक सनी गुप्ता , शिरोमणी स्वामी, दुर्गा ठाकरे,सरिता सूर,नगरसेविका, भद्रावती, गेडाम ताई, नगरसेविका, भद्रावती, पंकज नाशिककर,नगरसेवक वरोरा, राशी चौधरी, चंद्रकला चिमुरकर , राखी कालबंडे ,मनोहर स्वामी , भगतसिंग मालुसरे,मोनू चिमुरकर , सुभाष दांडले, सुनील वरखंडे, निलेश भालेराव व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते



0 Comments