बल्लारपुरात कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला परिसर सील : नागरिकांना जीवनावश्यक सेवा घरपोच पुरविन्यात येईल - प्रशासन
बल्लारपुर शहरातील सुभाष वार्ड
बल्लारपुर(राज्य रिपोर्टर) दिपक भगत : सद्यस्थितित देशभरात कोरोना या विषाणुजन्य आजाराने थैमान घातले असताना प्रशासनाच्या वतीने विविध प्रकारच्या सूचना नागरिकांना देण्यात येतात तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने 30 जून पर्यंत लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे.
यानुसार मा.जिल्हाधिकारी चंद्रपुर यांच्या आदेशानुसार बल्लारपुर शहरातील सुभाष वार्ड क्र - 30 तालुका बल्लारपुर जिल्हा चंद्रपुर या भागात कोरोना रुग्ण आढळून आल्यामुळे व त्याचा संसर्ग इतर नागरिकांना होवू नये या दृष्टिने एक्शन प्लान व कंटेन्मेंट झोन निश्चित करण्याचे ठरविन्यात आले आहे यानुसार पूर्व भाग - सिमेंट कांक्रीट रोड, पश्चिम भाग - श्री रमेश कैथवास यांच्या घरापासुन ते सार्वजनिक शौचालय परिसर, उत्तर - विनोद साहू यांच्या घराजवळ असलेली सर्विस गल्ली, दक्षिण भाग - सार्वजनिक रोड़ ते येल्लय्या मोंडय्या दासरफ यांच्या घराजवळ परिसर या सबंधित ठिकाणचा परिसर कंटेन्मेंट घोषित करण्यात आलेला आहे त्यामुळे सदर परिसरातील नागरिकांना पास देण्यात येवून कोणत्याही पूर्व परवानगी शिवाय आवागमनास प्रतिबंध घालण्यात आलेला आहे यानुसार ही पूर्व परवानगी आवश्यक सेवा पुरवीणाऱ्या व्यक्ति व अधिकारी यांना सुध्दा लागू राहील मात्र या क्षेत्रात कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय सेवेशी सम्बंधित असलेले डॉक्टर, नर्स, वैद्यकीय अधिकारी, मेडिकल स्टोर्स दुकानदार, पैथोलॉजीस्ट, रुग्नवाहिका यांना मुभा राहील तसेच प्रतिबंधक क्षेत्रात जीवनावश्यक सेवा या सकाळी 9:00 ते दुपारी 2:00 पर्यंत पुरविन्यात येईल तसेच सदर क्षेत्रात अत्यावश्यक सेवा पुरविताना सोशल डिस्टेंस चे पालन करण्यात यावे व इतर वैद्यकीय वा आरोग्यविषयक नियमाचे पालन करण्याची जबाबदारी तहसीलदार बल्लारपुर यानी त्यांचे अधीनस्थ कर्मचारी मार्फ़त करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या आहे
तसेच बल्लारपुर शहरात सापडलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या पार्श्वभूमीवर मा. जिल्हाधिकारी चंद्रपुर यांच्या सूचनेनुसार प्रतिबंधित क्षेत्रात कंटेन्मेंट झोन मध्ये मा जयंत पोहनकर तहसीलदार बल्लारपुर यांनी सहकाऱ्या सोबत भेट दिली व सबंधित क्षेत्रात नागरिकांना जीवनावश्यक सोई उपलब्ध असल्याची पाहणी सुध्दा केली.




0 Comments