जनहिताचे कामे करून पक्षविस्तार करा : खासदार बाळू धानोरकर
चंद्रपूर,(राज्य रिपोर्टर) : समाजातील शेवटच्या व्यक्तीचे प्रश्न सोडविणे हेच आपले लक्ष असून त्यांना प्राथमिकता दिली गेली पाहिजे. लोकशाही मध्ये जनहिताचे प्रश्न सोडून पक्षविस्तार करण्याची गरज असल्याचे मत खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केले. ते चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी व ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांना शुभेच्छा देतांना बोलत होते.
यावेळी कॉग्रेस नेते विनोद दत्तात्रेय, माजी नगरसेवक राजेश अडूर, प्रसन्न शिरवार, सोहेल भाई, अल्पसंख्याक अध्यक्ष ऍड. मलक शाकीर, संजय गंपावार, पप्पू सिद्धीकी, अनिस राजा, शाबीर शेख, कुणाल चहारे, धर्मेंद्र तिवारी, राजू वासेकर यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, राजकारणात विकासाला अडथळा पोहचविणार नाही याची नेहमी काळजी घ्यावी. पक्ष आहे म्हणून आपण आहोत हे नेहमी डोळ्यापुढे ठेवायला हवं. पुढील काळात पक्षविस्तार करण्याच्या दृष्टीने पक्षाने रितेश ऊर्फ रामू तिवारी व प्रकाश देवतळे यांना पक्षविस्ताराची जबाबदारी दिली आहे. हि जबाबदारी ते निश्चित पार पडून पक्षविस्तार करतील यात दुमत नाही. त्यांना पुढील वाटचालीकरता खासदार बाळू धानोरकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.



0 Comments