मनपाचे अत्याधुनिक रुग्णालय उभारा
कॉग्रेस पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री, खासदार यांच्याकडे केली मागणी
चंद्रपूर (राज्य रिपोर्टर): चंद्रपूर हे औद्योगिक शहर म्हणून ओळख असली तरी प्रदूषणाची मोठी समस्या भेडसावत असल्याचे आपल्या निदर्शनास येते. मोठ्या प्रमाणात नागरिक विविध आजाराने ग्रासत असतात. शहरात आरोग्याची सेवा खासगी रुग्णालयात घेणे महागडे होते. त्यामुळे महानगर पालिकेचे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याची लोकहितकारी मागणी कॉग्रेसचे पदाधिकारी विनोद दत्तात्रय, रामू तिवारी, संतोष लहामगे, संगीता अमृतकर, गोपाळ अमृतकर, सुनीता अग्रवाल, एकता गुरले यांनी पालकमंत्री विजय वड्डेटीवार, खासदार बाळू धानोरकर यांना केली आहे.
चंद्रपूर शहराची पाच लाखाच्या घरात लोकसंख्या आहे. परंतु महानगर पालिकेचे स्वतःचे अत्याधुकीक रुग्णालय नाही. चंद्रपूर जिल्हा राज्यात तसेच देशात प्रदूषणाठी नावाजलेला जिल्हा आहे. शहरात आशिया खंडातील औष्णिक वीज प्रकल्प आहे. त्यासोबत अन्य मोठे उद्योग आहेत. त्यामुळे महानगर पालिकेच्या जागेवर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारणे अत्यावश्यक आहे. औद्योगिक प्रकल्पाचे सामाजिक दायित्व निधी, खनिज विकास निधी, नगरोत्थान तसेच राज्य व केंद्र शासनाच्या निधी यांची सांगड घालून महानगरपालिकेच्या मुबलक उपलब्ध जागेवर १०० खाटांचे अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारावे त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी हे वरदान होणार आहे. महत्वाचं म्हणजे महानगर पालिकेच्या सेवेत १० डॉक्टर व १०० परिचारिका व तज्ञांच्या संच आहे. या संचाच्या योग्य वापर करून एक मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारावे अशी मागणी कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. हि मागणी त्वरित पूर्ण करण्याचे आश्वासन पालकमंत्री विजय वड्डेटीवार आणि खासदार बाळू धानोरकर यांनी दिले.




0 Comments