राजुरा चे तहसीलदार डॉ.रवींद्र होळी यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी
प्रहार चे नेते सूरज ठाकरे यांनी महसूलमंत्री मा. बाळासाहेब थोरात यांचेकडे केली मागणी
रेती तस्करांना पाठीशी घालत असल्याचे केले आरोप
टेंबुरवाही येथील स्वस्त राशन बंद करून बेकायदेशीररित्या परत सुरू केल्याची निवेदनातून तक्रार
चंद्रपुर,(राज्य रिपोर्टर) : राजुरा तालुक्यातील राजुरा तहसील कार्यालयाचे तहसीलदार यांचा 3 वर्षाचा कार्यकाळ कभी खुशी कभी गम सारख्या अवस्थेसारखा राहिलेला आहे.दीड वर्षाच्या कार्यकाळात तहसीलदार डॉ.रवींद्र होळी यांनी अवैध्य रेतीचे ट्रॅक्टर,ट्रक पकडुन मोठ्या प्रमाणात शासनाच्या तिजोरीत पैसा गोळा करून देण्याचे काम केले.त्यामुळे रेती तस्करांमधे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.परंतु गेल्या दीड वर्षापासून तहसीलदार यांच्या कारवाया कासवगतीने सुरू असल्याच्या आरोप प्रहार चे नेते सूरज ठाकरे यांनी केला आहे.इतकचं नाहीतर तहसीलदार यांचे विभागातील कोतवाल गुरुदास मधुकर गेडाम यांचे घराचे बांधकामाकरिता एक ट्रक रेती टाकल्याची तक्रार केली असता रेती तस्कराला पाठीशी घालून कारवाई करण्यात टाळाटाळ करत असल्याचे सूरज ठाकरे यांनी निवेदनात म्हंटले आहे.
तहसीलदार होळी यांनी मोठ्या तस्कराला अभय देत छोट्या रेती चोराला पकडुन थातूर मातुर कारवाई करत असल्याची तक्रार ठाकरे यांनी केली आहे.काही दिवसापूर्वी ७ स्वस्त राशन दुकानावर कारवाई करण्यात आली होती. परंतु टेंबुरवाही येथील स्वस्त राशन दुकान परत दुसऱ्याच दिवशी सुरू करण्यात आले.तहसीलदार यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून ते दुकान परत सुरू केल्याचे सूरज ठाकरे यांनी आपल्या निवेदनातून म्हंटले आहे.या सर्व प्रकाराची योग्य ती चौकशी करून तहसीलदार यांचे वर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अन्यथा लॉकडाऊन काळातच तहसीलदार डॉ.रवींद्र होळी यांचे विरोधात उपोषण करण्यात येईल असा इशारा महसूलमंत्री मा.बाळासाहेब थोरात यांना दिलेल्या निवेदनाच्या मार्फत दिला आहे.





0 Comments