जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना व रखडलेल्या योजना पुर्ण करा :ना. विजय वडेट्टीवार प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेची आढावा सभा


जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना व
रखडलेल्या योजना पुर्ण करा :ना.  विजय वडेट्टीवार
प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेची आढावा सभा
चंद्रपूर, दि.2 जून (राज्य रिपोर्टर): जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत जिल्ह्यात प्रस्तावित पाणीपुरवठा योजना तसेच रखडलेल्या योजना बाबत सर्व आकडेवारीसह माहिती घेऊन आगामी कालावधीमध्ये पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन,  इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.  विजय वडेट्टीवार यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.
नियोजन भवन येथे पार पडलेल्या आढावा बैठकीस सुरेश उपाख्य बाळू धानोरकरआ.प्रतिभा धानोरकरआ.किशोर जोरगेवारजिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनारजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिलेतसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्व विभाग प्रमुखाकडून सविस्तर आढावा घेताना खनिज प्रतिष्ठान अंतर्गत प्रस्तावित कामांचा या बैठकीत विशेषत्वाने आढावा घेतला. आतापर्यंत 27 यंत्रणांना निधी देण्यात आला आहे.या निधीअंतर्गत जिल्ह्याला 693 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून हा निधी प्रत्यक्ष बाधित क्षेत्रासाठी 66 टक्के तर अप्रत्यक्ष बाधित क्षेत्रासाठी 34 टक्के खर्च करावयाचा असून हेच निकष ग्राह्य धरून या निधीचा पुरेपूर वापर होईल याची दक्षता घेत अधिकाऱ्यांनीही कामे जलदगतीने करतानाच निर्धारित वेळेत पूर्ण होतील याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना देखील यावेळी केल्या.
बफर झोन क्षेत्रातील शाळांचा सर्वे करून शाळेतील वॉल कंपाऊंड बांधकाममुला-मुलींसाठी शौचालायेसोलर पॅनल लावण्यासाठी तसेच शुद्ध पाण्याची व्यवस्था त्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना जिल्हा परिषद शिक्षण विभागाला दिल्या.ग्रामीण भागातील बंद पडलेल्या व रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांची कामे एक महिन्यात पूर्ण करावे.असे निर्देशही यावेळी पालकमंत्री ना.  विजय वडेट्टीवार यांनी दिलेत.

Post a Comment

0 Comments