कोरपना नागरिकांची सुरक्षा राम भरोसे


कोरपना  नागरिकांची सुरक्षा राम भरोसे

कोरपना नगरपंचायत मात्र सुस्त दिसत आहेत

कूणीच मास्क  लावून दिसत नाहीत. सोशल डिस्टंसिंग चे पण पालन होत नाहि.

कोरपना,(राज्य रिपोर्टर) :  देशामध्ये covid-19 सारख्या भीषण महामारी ने हाहाकार माजवला, जिल्ह्यात रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, प्रशासनाचे दुर्लक्ष समजण्या पलीकडेआहे
 सूरुवातीला सर्वसामान्य नागरिक,कामगार,  ते व्यापारी बांधवांपर्यंत आणि शेतकऱ्यापासून ते मजूरा पर्यंत सर्वांनीच शासनाच्या आदेशाचे पालन केले आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे व्यापाऱ्याचे मजुरांचे खूप हाल झाले असतानाही कुठे तरी प्रशासनाला  सहकार्य करण्याच्या हेतूने नागरिकांनी सर्व काही सहन केले पण, 
शासकीय प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी,पोलिस, नगरपंचायत यांनी मात्र सर्रास दुर्लक्ष केले आहे. काही दिवसापूर्वीच कोरपना पासून फक्त बावीस किलोमीटर वरती गडचांदूर येथे रुग्ण मिळाल्यावर सुद्धा  आणि वणी येथे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असताना सुद्धा कोरपना नगरपंचायत मात्र सुस्त दिसत आहेत. नागरीकांकडून सर्रास नियमाची पायमल्ली होताना दिसताहेत, जिल्ह्यात 144 धारा लागू असताना सुद्धा   बाजारपेठेमध्ये जत्रे सारखी  गर्दी जमते आहे,  कूणीच मास्क  लावून दिसत नाहीत. सोशल डिस्टंसिंग चे पण पालन होत नाहि.
 प्रशासनाने व्यापाऱ्यांना  वेळेचे बंधन दिले आहेत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच मात्र कोरपणा येथे काही मोठे व्यापारी जाणीवपूर्वक वेळे नंतरही दुकान उघडे ठेवतात ,ज्यांचे हितसंबंध चांगले आहेत त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही आणि छोटे दुकानदार मात्र वेळ बंद करत आहात.   काही मोजक्या व्यापाऱ्यांमुळे  इमानदार व्यापारी आहेत त्यांना अडचण होत आहे कारण जे वेळेवर बंद करतात आणि काही लोकं सहा साडेसहा पर्यंत दुकाने चालू ठेवतात त्यांना कोणीच काही म्हणत नाहीत त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये  संतापाची लाट उसळली आहे,  
जिल्ह्यामध्ये  दिवसेंदिवस वाढणारी रुग्ण संख्या बघता मुख्याधिकारी मॅडम नगर नगरपंचायत कोरपना यांची डोळेझाक ही कमालीची  आहे.
शासनाने लावलेले निर्बंध व नियम जसे मास्क सोशल डिस्टंसिंग वेळेचे बंधन या सर्व बाबींचे पालन न करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावि  ही मागणी कोरपना येथील नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments