अपघाताच्या 10 ते 15 दिवसानंतरही ट्रक जैसे थे : पुन्हा अपघात घडण्याची शक्यता


अपघाताच्या 10 ते 15 दिवसानंतरही ट्रक जैसे थे : पुन्हा अपघात घडण्याची शक्यता        

   बल्लारपुर,(राज्य रिपोर्टर) : बल्लारपुर शहरात ०८ जून २०२० रोजी  शहरातील गुरुनानक विज्ञान महाविद्यालय चौक परिसरात सायंकाळी ५:०० वाजताच्या सुमारास एका ट्रक ने दुचाकीस्वारास चिरडले दुर्देवाने या अपघातात त्यांच्या मृत्यु झाला.
 व या अपघातामुळे अवजड वाहन ट्रक क्र TS 03 UA 4489  बल्लारपुर पोलिस स्थानक परिसरातील मुख्य मार्गावर उभे आहे जवळपास मागील 10 ते 15 दिवसांपासून सदर वाहन आहे त्याचस्थितित उभे असल्यामुळे नगर परिषद कडून वळण घेत असतांना व वस्ती विभागाकडे जात असतांना सदर ट्रक मुळे अळथळा निर्माण होवून पुन्हा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 त्यामुळे नागरिकांनी या अपघातग्रस्त ट्रक ला अन्य ठिकाणी स्थानांतरित करावी अशी मागणी सुध्दा केली असल्याची माहिती आहे त्याचप्रमाणे कालच सिमेंट टैंकर ने एका इसमास  लगतच्या पेपरमिल 7 नम्बर गेट जवळ चिरडले व यात एका अनोळखी इसमाचा मृत्यु झाला सदर सिमेंट टैंकर सुध्दा बल्लारपुर ग्रामीण रुग्णालय लगत राज्य महमार्गावर उभे आहे म्हणजे व्यवस्था सदर वाहने रस्त्यावर उभी करून अपघाताला आमंत्रण देते की काय असा प्रश्न नागरिकामध्ये निर्माण होत आहे.

Post a Comment

0 Comments