पदवीधर मतदारसंघाची
मतदार नोंदणी कार्यक्रम
चंद्रपूर,(राज्य रिपोर्टर): दिनांक 1 नोव्हेंबर 2019 या अर्हता दिनाकांवर आधारीत नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीत पात्र मतदाराची नाव नोंदणी कार्यक्रम सुरु आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र मतदारांनी नावे नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.
1 नोव्हेंबर, 2019 या अर्हता दिनाकांपूर्वी किमान 3 वर्षे पूर्वी ज्या नागरिकांनी पदवी प्राप्त केलेली आहे. अशा पात्र पदविधर मतदारांनी स्वतःचे पासपोर्ट आकाराचे फोटो जोडून तालुक्यातील तहसिलदार यांचेकडे नमूना-18 मध्ये अर्ज सादर करुन स्वत:चे नांव पदविधर मतदार यादीत समाविष्ट करून घ्यावे.
सदर अर्ज https://ceo.maharashtra.gov. in/gonline/form18 या लिंक तर सुध्दा पात्र पदविधर मतदारांना नमूना-18 मध्ये अर्ज सादर करता येईल. तरी या संधीचा पात्र पदविधर मतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


0 Comments