महाराष्ट्र राज्य पञकार संघाचे राज्य संघटक ,छञपतीक्रिडा पुरस्कार विजेते , शिक्षणतज्ञ तथा जेष्ठ पञकार संजय भोकरे यांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर संधी द्यावी.


महाराष्ट्र राज्य पञकार संघाचे राज्य संघटक ,छञपतीक्रिडा पुरस्कार विजेते , शिक्षणतज्ञ तथा जेष्ठ पञकार   संजय भोकरे यांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर संधी द्यावी.                  

 राज्यभरातून पत्रकारांची मागणी

    मुंबई (राज्य रिपोर्टर) : महाराष्ट्र राज्य पञकार संघाचे राज्य संघटक तथा   जेष्ठ पञकार शिक्षण तज्ञ ,महाराष्ट्र शासनाचा क्रिडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा छञपती क्रिडा पुरस्कार विजेते अष्टपैलू वस्ताद संजयजी भोकरे यांना राज्यपाल नामनियुक्त विधान परिषद सदस्य पदासाठी संधी द्यावी अशी तमाम  पञकारांची ईच्छा आहे. कायद्यानुसार राज्यपाल विज्ञान , साहित्य ,कला ,सहकार ,शिक्षण ,समाजसेवा या विषयातील तज्ञ व्यक्ती त्यांचे समाज उन्नतीसाठी बहुमूल्य योगदान असणे आवश्यक असते अशा तज्ञांना  नामनियुक्त सदस्य नियुक्त  करतात  .वरील बाबींचा अभ्यास करता संजय भोकरे कायद्याची नियमांची  अट पूर्ण करत आहेत .संजय भोकरे हे अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणून पूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे.ते पञकारितेत खूप वर्षापासून कार्यरत आहेत जेष्ठ संपादक असलेले भोकरे हे श्री अंबाबाई तालीम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगली सारख्या ग्रामीण भागात अभियांत्रिकी च्या शिक्षणाची दारे विद्यार्थ्यांना खुली केली शिवाय याच संस्थेमार्फत अनेक  पैलवान घङवले .
त्यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाच्या माध्यमातून पञकारांसाठी न्याय हक्कासाठी राज्यभर जाळे निर्माण केले.पञकार संघात आघाडीच्या चॕनेल ,दैनिकाचे   संपादक ,वृत्तसंपादक, जेष्ठ पञकार तसेच बातमीदार ,वार्ताहर जोडले गेलेले आहेत.पञकार संरक्षण कायदा लवकर अंमलात यावा यासाठी त्यांनी स्वतंत्र लढा दिला व कायदा संमत करुन घेतला तसेच राज्य पञकार संघा बरोबर पूर्ण देशभरात पञकारांचे व्यासपीठ असावे म्हणून आॕल ईंडीया जर्नालिष्ट ची स्थापना केली नवी दिल्लीत मोठे कार्यालय सुरु आहे.
प्रत्येक वर्षी पञकार संघाचे राज्य अधिवेशन संपन्न होते त्यात पञकारांच्या विविध मागण्या संदर्भात चर्चा करुन ठराव शासनाकडे पाठवून पाठपुरावा केला जातो.राज्यातील बहुतांशी शहरात पञकार भवन उभे केले.पञकारांच्या पाल्यांना शिक्षणात सवलती तसेच ग्रामीण भागातील पञकारांना सवलती मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.पञकारांना संघटनेच्या मार्फत पाच लाखाचा विमा संरक्षण दिले.
पञकारांचे प्रश्न ,शासकीय सवलती मिळाव्यात या उद्देशाने देशाचे  पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, तत्कालीन संरक्षण मंत्री स्व.मनोहर पर्रीकर ,राज्यपाल राम नाईक अशा दिग्गजांना संघटनेच्या व्यासपीठावर बोलावले .प्रत्येक वर्षी आघाडीच्या दैनिकातील उत्कृष्ट कामगिरी करणार्या संपादकाला स्व.जवाहरलाल दर्डा  जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते .या मध्ये दै.पुण्यनगरीचे मालक मुरलीधर शिंगोटे,जेष्ठ पञकार स्व.अनंत दिक्षीत,खासदार कुमार केतकर,दिनकर रायकर,संदीप कुमावत,सुकृत खांडेकर यांना सन्मानित केले आहे.तसेच सध्या जेष्ठ पञकार व विविध गुणवंताना एक लाख रु,रोख स्वरुप असलेला पुरस्कार सुरु केला आहे.त्यात योगगुरु रामदेवबाबा,जहीर खान,अजिंक्य रहाणे,मकरंद अणासपुरे,जाॕकी श्राॕफ सह अनेकांचा समावेश आहे. 
संजयजी भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य पञकार संघ सामाजिक ,शैक्षणिक ,सांस्कृतिक  क्षेञात विविध अंगाने कार्यपूर्ती करत आहे.राज्य पञकार संघाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात पञकारासाठी हेल्मेट वाटप केले तसेच प्रत्येक वर्षी वारकरी बांधवांची सेवा केली जाते ,शक्य असेल तिथे गरजू मुलांना शालेय शिक्षणासाठी मदत,साहित्य वाटप केले जाते .सध्याच्या कोरोना साथ रोगाच्या काळात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राज्य संघटक संजयजी भोकरे यांचे मार्गदर्शनाखाली गरजूना किराणा वाटप,तसेच जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले ,कामगारांना भोजन व निवार्याची सोय करण्यात आली.

एकंदरीतच सांगायचे झाले तर संजय भोकरे यांच्या  मार्गदर्शनाखाली कार्य करत असलेल्या महाराष्ट्र राज्य पञकार संघाचे कार्य उल्लेखनीय आहे. 
जेष्ठ पञकार ,छञपती क्रिडा पुरस्कार विजेते  ,शिक्षण तज्ञ ,अष्टपैलू हरहुन्नरी  व्यक्तीमत्व  संजयजी भोकरे यांच्या पञकारितेतील,संघटनेतील ,क्रिडा ,शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत एक पञकारांचा प्रति byनिधी म्हणून त्यांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषद सदस्य पदासाठी संधी द्यावी ही महाराष्ट्रातील तमाम पञकारांची ईच्छा आहे.

Post a Comment

0 Comments