चंद्रपूर जिल्हातील अॅक्टीव्ह बाधितांची संख्या 29 आतापर्यंतचे कोरोना बाधित 55 ब्रम्हपुरी तालुक्यातील आणखी एक पॉझिटीव्ह


चंद्रपूर जिल्हातील अॅक्टीव्ह बाधितांची संख्या 29
आतापर्यंतचे कोरोना बाधित 55
ब्रम्हपुरी तालुक्यातील
आणखी एक पॉझिटीव्ह
चंद्रपूर,दि.18 जून(राज्य रिपोर्टर): जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील आवलगाव येथील आणखी एका 25 वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज गुरुवारी जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या वृत्तानुसार गांगलवाडी येथील कोरोना बाधिताच्या संपर्कातील हा युवक असून 17 जून रोजी या युवकाचा घेण्यात आलेला स्वॅब पॉझिटिव्ह असल्याचे आज वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे.
आवलगाव येथील हा युवक मुंबईवरुन 14 तारखेला अन्य तीन सहकाऱ्यांसोबत पोहचला होता. यांच्यासोबतच्या अन्य दोन नागरिक वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील आहेत. ते पुलगावला थांबले. 14 तारखेला गावात पोहोचल्यानंतर या युवकाला शाळेमध्ये संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यानंतर 16 जून रोजी ब्रह्मपुरी कोविड केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात आले. 17 जून रोजी त्याचे स्वॅब घेण्यात आले. 18 जूनला त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या पॉझिटिव्ह अहवालामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह बाधिताची आतापर्यंतची संख्या 55 झाली आहे. आतापर्यंत 26 बाधित कोरोना मुक्त होऊन त्यांना सुटी देण्यात आली आहे.जिल्ह्यामध्ये सध्या ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह बाधितांची संख्या 29 आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
जिल्ह्यात एकूण 25 कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आलेले आहे. एक कंटेनमेंट झोन सुरु करण्याची प्रक्रिया सुरु आहे.  14 कंटेनमेंट झोनचे 14 दिवस पूर्ण झाले आहे. त्यामुळे सदर झोन बंद करण्यात आलेले आहे. सध्या जिल्ह्यात 10 कंटेनमेंट झोन कार्यरत आहेत. आजपर्यंत एकूण 24 कंटेनमेंट झोनमधील आयएलआय रुग्णांचे 59 स्वॅब घेण्यात आलेले आहे. यापैकी 54 नमुने निगेटिव्ह,एक पॉझिटिव्ह व चार नमुने प्रतीक्षेत आहेत.
कोविड-19 संक्रमित 55 बाधितांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातूनजिल्ह्यातून, रेडझोन मधून प्रवास केल्यामुळे बाधितांची संख्या वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली -4, हरियाणा (गुडगाव)-1, ओडीसा-1, गुजरात-4, हैद्राबाद-1, मुंबई-8, ठाणे -3, पुणे-6, नाशिक -3, जळगांव-1, यवतमाळ -4, प्रवासाचा कोणताही इतिहास नसलेले-4, संपर्कातील व्यक्ती - 15 आहेत.
तालुकानिहाय बाधितांची संख्या:
ग्रामीण भागामध्ये तालुका चंद्रपूर 7, बल्लारपूर दोन, पोंभूर्णा एक, सिंदेवाही दोन, मुल तीनब्रह्मपुरी 12, नागभीड चार बाधित आहे. शहरी भागामध्ये बल्लारपूर तीनवरोरा दोनराजुरा दोनमुल एकभद्रावती एकब्रह्मपुरी एककोरपणा एकनागभिड एक बाधित आहेत. तर चंद्रपूर महानगरपालिका भागामध्ये कृष्णनगर दोन, बिनबा गेट एकबाबुपेठ दोनबालाजी वार्ड एकभिवापूर वार्ड एकशास्त्रीनगर एकसुमित्रानगर चार बाधित आहेत. असे एकूण बाधितांची संख्या 55 वर गेली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार,जिल्ह्यामध्ये 2 हजार 627 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी 55 नमुने पॉझिटिव्ह, 2 हजार 304 नमुने निगेटिव्ह, 250 नमुने प्रतीक्षेत तर 18 नमुने अनिर्नयीत आहेत.
दिनांक 18 जून रोजी एकूण जिल्ह्यातील संस्थात्मक अलगीकरणात 1 हजार 133 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 418 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात  आहेत.तालुकास्तरावर 402 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात  आहेत. तरजिल्हास्तरावर 313 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात  आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यात 78 हजार 823 नागरिक दाखल झाले आहेत.तसेच 74 हजार 202 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले असून 4 हजार 621 नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू आहे.
चंद्रपूरमध्ये आतापर्यत मे ( एक बाधित ), 13 मे ( एक बाधित), 20 मे ( एकूण 10 बाधित ), 23 मे ( एकूण बाधित), 24 मे ( एकूण बाधित), 25 मे ( एक बाधित ), 31 मे ( एक बाधित ), 2 जून (एक बाधित), 4 जून (दोन बाधित), 5 जून ( एक बाधित),6 जून ( एक बाधित), 7 जून ( 11 बाधित),9 जून ( एकुण बाधित), 10 जून ( एक बाधित), 13 जून ( एक बाधित), 14 जून ( एकुण तीन बाधित),15 जून (एक बाधित), 16 जून ( एकुण बाधित), 17 जून ( एक बाधित),18 जून ( एक बाधित) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधित 55 झाले आहेत. आतापर्यत 26 बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे  55 पैकी अॅक्टीव्ह बाधितांची संख्या आता 29 आहे.

Post a Comment

0 Comments