नगरसेवकाच्या तत्परतेने प्राणहानी व वित्तहानी टळली



 नगरसेवकाच्या तत्परतेने प्राणहानी व वित्तहानी टळली 

नगर परिषद बल्लारपूर चे नगरसेवक सिक्की (विनोद) यादव


 बल्लारपुर  (राज्य रिपोर्टर) दीपक भगत : बल्लारपुर शहरातील गोकुल नगर वार्ड परिसरातील कलामंदिर चौक, बल्लारपुर नाक्याच्या समोरिल एक मोठे वृक्ष हे आज आलेल्या वादळामुळे मूळासह कोसळते की काय अशी स्थिति होती तसेच सदर मोठे वृक्ष कुणाच्या घरावर किंवा या परिसरात असलेल्या भांडी विकणाऱ्या दुबे यांच्या दुकाणावर तसेच विजेच्या तारावर तसेच दूरसंचार/केबल च्या ताराच्या सहायाने लटकले असल्याचे दिसत असताना नागरिकांनी दिलेल्या सूचनेच्या आधारावर या प्रभागाचे नगरसेवक श्री सिक्की(विनोद) यादव यांनी तत्परता दाखवित आपल्या मित्र परिवार व सम्बंधित अधिकाऱ्यांच्या मदतीने सदर वृक्षची देखभाल करून यामुळे कुणाचीही प्राणहानि किंवा वित्तहानि होवू नये यांची दक्षता घेण्यात आली मात्र सदर कारवाई होईपर्यंत काही काळा साठी विजपुरवठा खंडित करण्यात आला होता सदर वृक्ष कला.
 सदर वृक्ष कलामंदिर परिसरातील बस स्टैंड च्या समोरिल परिसरात असून नगरसेवकाने दाखविन्यात आलेल्या तत्परतेमुळे एक मोठ्या वृक्षाचे जतन करण्यात आले तसेच यामुळे नागरिकांना सुध्दा कसल्याही प्रकारचा त्रास झाला नसल्याचे दिसले.

Post a Comment

0 Comments