आणखी तीन कोरोना बाधीत ; चंद्रपूरमध्ये कोरोना बाधीतांची संख्या 47 वर


आणखी तीन कोरोना बाधीत ;
चंद्रपूरमध्ये कोरोना बाधीतांची संख्या 47 वर
Ø  शनिवारी एक बाधीत कोरोना मुक्त
Ø  आतापर्यंत 24 बाधीत कोरोना मुक्त
Ø  ॲक्टिव्ह बाधितांची संख्या 23
Ø  12 कंटेनमेंट झोन बंद तर 11 कंटेनमेंट झोन कार्यरत
Ø  आरोग्य सेतू ॲपचा वापर करून बाधीतांची शोध मोहीम
Ø  बाहेरुन येणाऱ्या नागरिकांनी नोंदणी व आरोग्य तपासणी करावी
चंद्रपूर,(राज्य रिपोर्टर): चंद्रपूर शहरामध्ये तुकूम परिसरात आणखी दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. बाधीताच्या संपर्कातील या दोन्ही महिला आहेत. तर ब्रह्मपुरी तालुक्यातील अड्याळ टेकडी येथील पॉझिटिव्ह बाधीताच्या संपर्कातील तळोधी खुर्द येथील आणखी एक नागरिक बाधीत आढळून आला आहे. रविवारी तीन नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 47 झाली आहे.

जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सुमित्रा नगरतुकुम परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रातील बाधीत 47 वर्षीय पत्नी व 30 वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दोघींची प्रकृती स्थिर आहे.दुसरा 20 वर्षीय युवक अड्याळ टेकडी येथील बाधीताच्या संपर्कातील आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील तळोधी खुर्द येथील या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.
यासोबतच जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या 47 झाली आहे. काल शनिवारला एक कोरोना बाधीत कोरोना मुक्त झाल्यामुळे  सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत 24 बाधीतांना कोरोना मुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. नवीन तीनही रुग्ण बाधीत रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे पॉझिटिव्ह ठरले आहेत. सध्या अॅक्टिव्ह बाधीतांची संख्या 23 आहे. यापैकी 18 बाधीत कोविड केअर सेंटर वन अकादमी चंद्रपूर तर 5 बाधीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे भरती करण्यात आलेले आहे.या सर्व बाधीतांची प्रकृती स्थिर आहे.
12 कंटेनमेंट झोन बंद तर 11 कंटेनमेंट झोन कार्यरत:
जिल्ह्यात एकूण 23 कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आलेले आहे. यापैकी 12 कंटेनमेंट झोनचे 14 दिवस पूर्ण झाले आहे. त्यामुळे सदर झोन बंद करण्यात आलेले आहे. सध्या जिल्ह्यात 11 कंटेनमेंट झोन कार्यरत आहेत.
कंटेनमेंट झोनमध्ये आरोग्य पथकामार्फत सर्वेक्षण:
आजपर्यंत एकूण 21 कंटेनमेंट झोनमधील आयएलआय रुग्णांचे 55 स्वॅब घेण्यात आलेले आहे. यापैकी 52 नमुने निगेटिव्ह,एक पॉझिटिव्ह व दोन नमुने प्रतीक्षेत आहेत.
सर्व कंटेनमेंट झोनमध्ये रुग्णांचा व इतर सर्व रुग्णांचा नियमित पाठपुरावा सुरू आहे. कंटेनमेंट झोनमध्ये सर्व कुटुंबातील लोकसंख्येचे दैनंदिन 14 दिवस आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे.आयएलआय व सारीचे रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात येत आहे. तसेच आयएलआय व सारी रुग्णांचे स्वॅब नमुने घेण्यात येत आहेत.
कोविड-19 संक्रमित 47 बाधीतांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातूनजिल्ह्यातून,रेडझोन मधून प्रवास केल्यामुळे बाधीतांची संख्या वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली -2हरियाणा (गुडगाव)-1ओडीसा-1,गुजरात-1, हैद्राबाद-1,मुंबई-7ठाणे -3पुणे-6नाशिक -3,जळगांव-1, यवतमाळ -4,  प्रवासाचा कोणताही इतिहास नसलेले-3संपर्कातील व्यक्ती - 14 आहेत.
आरोग्य सेतू ॲपचा वापर करून बाधीतांची शोध मोहीम:
दिनांक 11 जून पासून आरोग्य सेतू ॲप वरील मिळालेल्या माहितीच्या आधारे ब्लूटूथ निकटता (ब्लूटूथ प्रॉक्सीमिटी) गंभीर आजार असलेलेकोविडचे संभाव्य लक्षणे असणाऱ्या (अनवेल कोमॉरबीडीटी) व्यक्तींचा डाटा प्राप्त करून मुख्य वैद्यकीय अधिकारी (महानगरपालिका चंद्रपूर)संबंधित तालुका आरोग्य अधिकारी,उपजिल्हा रुग्णालय,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना यादी पाठविण्यात येते.सदरील व्यक्तींची आरोग्य तपासणी करून जवळच्या कोविड केअर सेंटरला संदर्भित करून व स्वॅब घेवून शोध मोहीम सुरू केलेली आहे.
कोविड-19 ची सर्वसाधारण माहिती:
जिल्ह्यामध्ये 2 हजार 255 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी 47 नमुने पॉझिटिव्ह,2 हजार 31 नमुने निगेटिव्ह163 नमुने प्रतीक्षेत तर 14 अनिर्नयीत  आहेत.
जिल्ह्यातील एकूण संस्थात्मक अलगीकरणात 1 हजार 223 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 496 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात  आहेत. तालुकास्तरावर 436 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात  आहेत. तरजिल्हास्तरावर 291 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात  आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 77 हजार 480 नागरिक दाखल झाले आहेत.तसेच 73 हजार 18 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. 4 हजार 462 नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू आहे.
आतापर्यंतचे कोरोना बाधीतांचे विवरण :
चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधीत )13 मे ( एक बाधीत)20 मे ( एकूण 10 बाधीत )23 मे ( एकूण 7 बाधीत),24 मे ( एकूण 2  बाधीत)25 मे ( एक बाधीत )31 मे ( एक बाधीत )2 जून (एक बाधीत)4 जून ( दोन बाधीत)5 जून ( एक बाधीत),6 जून ( एक बाधीत)7 जून ( 11 बाधीत),9 जून ( एकुण 3 बाधीत),10 जून ( एक बाधीत),13 जून ( एक बाधीत),14 जून ( एकुण तीन बाधीत),
अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधीत 47 झाले आहेत. आतापर्यत 24 बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 47 पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता 23 आहे.
बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी नोंदणी व आरोग्य तपासणी करावी :
बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी चंद्रपूर शहरात शकुंतला लॉन येथे नोंद व तपासणी करावी. जिल्ह्याच्या अन्य तालुक्याचे ठिकाणी बस स्टॅन्ड परिसरात ही आरोग्य तपासणी व नोंदणी सुरू आहे. जबाबदार नागरिक म्हणून बाहेरून आलेल्या प्रत्येक नागरिकांनी आपल्या नावाची नोंदणी व आरोग्य तपासणी करावीअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Post a Comment

0 Comments