11 लाख 27 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश
18 जुगारी अटकेत
चंद्रपूर व बल्लारपूर पोलिसांची संयुक्त कारवाई
चंद्रपूर,(राज्य रिपोर्टर) : जुगार खेळणाऱ्या काही जुगारांना जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने धाड टाकून तब्बल १८ जुगाराना रंगेहाथ अटक केल्याची घटना आज सायंकाळी ५ च्या दरम्यान घडली असून तब्बल ११ लाख २७ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
हि घटना बल्लारपूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जुनोना तलाव जवळ जंगलात घडली असून चंद्रपूर रहिवासी काही इसम मोठया प्रमाणात तीन पत्ती जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक मलिक, उपपोलिस निरीक्षक सचिन यादव(पडोली), उपपोलिस निरीक्षक प्रवीण सोनुने(दुर्गापूर)यांच्या संयुक्त पथकाने साय,5च्या दरम्यान जूनोना तलाव जवळ जंगलात जुगार खेळताना 18 आरोपींना रंगेहाथ पकडले, व त्यांचा कडून रोख रक्कम अंदाजे चार लाख,२० मोबाईल, दोन मोपेड, एक ऑटो रिक्षा, असे मिळूनअंदाजे 11 लाख 27 हजार रु, चा मुद्दे माल जप्त करण्यात आलाअसून सर्व आरोपी चंद्रपूर रहिवासी असल्याची माहिती आहे. त्या सर्वाना मुद्देमाला सह बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांचा मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी जाधव व पोलिस निरीक्षक एस. एस.भगत यांचा संयुक्त पथकाने केली,



0 Comments