शेतकऱ्यांना प्रति क्विंटल एक हजार रुपये बोनस द्या : खासदार बाळू धानोरकर


शेतकऱ्यांना प्रति क्विंटल एक हजार रुपये बोनस द्या : खासदार बाळू धानोरकर 

चंद्रपूर(राज्य रिपोर्टर) : चंद्रपूर जिल्ह्यातील कापूस खरेदी करीत अद्यापही ग्रेडर्सच्या नियुक्त्या न झाल्यामुळे कापूस खरेदी व्यवस्थितरीत्या होत नाही. व शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल कापूस घरात पडून आहे. पावसाळा सुरु होण्यास काही दिवसचं शिल्लक राहिलेला असून शेतकरी संकटात सापडलेला आहे. तरी शासनाने शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांकडे विकण्याची परवानगी देऊन प्रति क्विंटल एक हजार रुपये अनुदान जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे. 
केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. यात अक्षम्य दुर्लक्ष होत असून तात्काळ ग्रेडर्सच्या नियुक्त्या होणे आवश्यक आहे. सी. सी. आय व फेडरेशन मार्फत १५ जून पूर्वी कापूस खरेदी शक्य न झाल्यास शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्यांना जरी कापूस विकला तरी प्रति क्विंटल एक हजार बोनस देऊन त्यांना सहकार्य करावे अशी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे

Post a Comment

0 Comments