चिमूर पोलिसांनी पकडली हातभट्टी मोहदारू चा मोठया प्रमाणात दारू एकूण ८ लाख २२ हजाराचा रुपयांचाअवैध मोहा दारू साठा



चिमूर पोलिसांनी पकडली हातभट्टी मोहदारू चा मोठया प्रमाणात दारू  एकूण ८ लाख २२ हजाराचा रुपयांचाअवैध मोहा  दारू साठा

चंद्रपूर,चिमूर (राज्य रिपोर्टर) : कोरोना लाकडाऊन च्या पार्श्वभूमीवर चिमूर तालुक्यात अवैध दारू तस्करीची मोठी कारवाई करण्यास पोलिसांना यश मिळाले.  दिनांक  २९ मे २०२० रोजी चिमूर तालुक्यातील  सोनेगाव बेगडे या गावालगत जंगल परिसरात हातभट्टी मोहदारू चा साठा मोठया प्रमाणात  असल्याची गुप्त माहिती च्या आधारे चिमूर चे पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांना मिळाल्याने त्यांनी पोलीस स्टॉप सह होमगार्ड याना सोबत घेऊन सोनेगाव बेगडे चा जंगल परिसर पूर्णपणे पिंजून काढून नाल्याचे भागात दोन ठिकाणी हातभट्टी मोहदारू चा मोठया प्रमाणात दारू  एकूण ८ लाख २२ हजाराचा रुपयांचाअवैध मोहा  दारू साठा मिळून आल्याने दोन आरोपीवर दारू बंदी अंतर्गत  कारवाही करण्यात आली.
   सदरची कारवाही पोनी स्वप्नील धुळे यांचे सोबत पोहवा विलास सोनूले, विलास निमगडे , नापोशी किशोर बोढे, पोशी सचिन गजभिये , विनायक सरकुंडे, सतीश झिलपे, भरत गोडवे,शैलेश मडावी, शंकर बोरसरे , शरीफ शेख , होमगार्ड राजू कामडी, प्रमोद बनकर, राजू चौधरी, रवी गायकवाड, अतुल नागपुरे, कवडू दिघोरे यांनी पार पाडली.
ठाणेदार स्वप्नील धुळे यांच्या सतर्कतेमुळे चिमूर तालुक्यातील मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहे.

Post a Comment

0 Comments