कॉन्व्हेंट शाळेचे शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन मिळण्याकरिता जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश
अनेक खाजगी शाळा
बल्लारपूर,(राज्य रिपोर्टर) : देशात सुरू असलेल्या कोरोना कोविड19 च्या पार्श्वभूमीवर महामारीमुळे आलेल्या संकटात फिज वसुली आलेली नाही म्हणून बहाणा करीत या संस्था आपल्या कर्मचाऱ्यांना वेतनापासून वंचित ठेवत आहे.
या संस्थेत जनतेच्या पैशावर सेवाभावी वृत्तीने चालविल्या साठी रजिस्टर आहे. परंतु जनतेच्या पैशाचा गैरवापर करून या संस्थेचे ट्रस्टी कायद्याचे उल्लंघन करीत आहे. संस्थेत पैसा असूनही ते कर्मचाऱ्यांना वेतनापासून वंचित ठेवत आहे. संस्थेचा पैसा गैरमार्गाने दुसरीकडे वळवीत आहे .
वरील प्रकार हा पब्लिक ट्रस्ट कायद्या चे उल्लंघन करीत असून याबाबत रितसर चौकशी होणे गरजेचे असून कान्व्हेंट शिक्षकांची पण आर्थिक परिस्थिती ही हालाकीची झालेली आहे याला नाकारता येत नाही म्हणून
नोकरी करणाऱ्या शिक्षक व कर्मचारी यांना त्यांच्या हक्काचे वेतन मिडायला पाहिजे या करीता बल्लारपूर चे काही शिक्षक शिक्षक ,पालक एकता मंच,चंद्रपूर जिल्हा कॉन्व्हेंट विभाग पदाधिकारी शिक्षक श्री किशोर मोहूर्ले सर,श्री श्रीकांत उपाध्याय सर,तसेच सहयोगी शिक्षक आदिल शेख सर,प्रतीक दडमल सर,सुनील कांबळे सर तसेच युवा सामाजिक कार्यकर्ता इंजि.श्री देवेंद्र वाटकर यांनी मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर, मा.आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी वित्तमंत्री महाराष्ट्र राज्य,
मा.हंसराज अहिर माजी गृहराज्यमंत्री भारत सरकार, मा.नागोजी गाणार शिक्षक आमदार नागपूर विभाग यांना निवेदन दिले.




0 Comments