कोरपना पोलीस स्टेशन
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; पाच लाख ५६ हजार चा साठा जप्त
गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने धाड टाकली.
५१ पेट्या देशी दारू, १६६ नग विदेशी दारू , अंदाजे किंमत पाच लाख ५६ हजार ची आढळून आली.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; पाच लाख ५६ हजार चा साठा जप्त
गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने धाड टाकली.
५१ पेट्या देशी दारू, १६६ नग विदेशी दारू , अंदाजे किंमत पाच लाख ५६ हजार ची आढळून आली.
कोरपना(राज्य रिपोर्टर) : महत्वाचे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाॅक डाऊनची चौथी स्टेप 31 मे पर्यंत आहे. तोपावेतो जिल्ह्यांमध्येही कडक संचारबंदी लागू करण्यात आली असून जिल्हाअंतर्गत प्रवास विना परवानगीने सुरू असून जिल्ह्याबाहेरून येताना परवानगीची गरज असल्याचा नियम आजही लागु आहे. बाहेर जिल्ह्यातून आलेल्यांना चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये institutional कोरोनटाईन करण्याचे सक्तीचे आदेश आहेत, मग दारूचा पुरवठा करणारे व विक्री करणाऱ्यांवर संचारबंदीच्या नियमाप्रमाणे सुद्धा कठोर कारवाई करण्यात यायला हवी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वनसडी येथील एका घरातून अवेध दारू साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली.
प्राप्त माहिती नुसार, वनसडी येथील एका घरात दारू साठा स्टॉक केला आहे. या गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने धाड टाकली. त्यात ५१ पेट्या देशी दारू, १६६ नग विदेशी दारू , अंदाजे किंमत पाच लाख ५६ हजार ची आढळून आली. या प्रकरणातील आरोपी मनोज घोडाम , अमर वेटी रा. वनसडी हे मात्र दोघेही फरार होण्यात यशस्वी झाले.
सदर कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पद्माकर भोयर, प्रकाश बल्की, सतीश बगमारे, मिलिंद जांभुळे यांनी केली. या कारवाईमुळे दारू तस्करांना चांगलाच चाप बसला आहे.



0 Comments