धक्कादायक घटना शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विलगिकरण कक्षात 2 मृत्यू


धक्कादायक घटना  शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विलगिकरण कक्षात 2 मृत्यू
चंद्रपूर(राज्य रिपोर्टर) : चंद्रपूर शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विलगिकरण कक्षात 2 मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज येथे घडली.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासनाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात विलगीकरण कक्ष सुरू केले. या कक्षात आज दोन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे प्रशासनात खळबळ माजली असून त्यात
एक आत्महत्या व एक ह्रदयविकार
मागील काही दिवसांपासून हे दोघेही संस्थात्मक विलगीकरन कक्षात होते.सदर घटना आज 30 मे रोजी सकाळीच ही घटना लक्षात आल्याने प्रशासनात खळबळ उडाली असुन दोन्ही घटनांतील कारणे काय ह्याचा शोध घेणे सुरू आहे.
आत्महत्या केलेला मिथुन सरकार हा 30 वर्षीय युवक मागील 23 मे पासुन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात संस्थात्मक विलगीकारणात होता. आज त्याने गळफास लाऊन आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे.
49 वर्षीय संतोष निकोडे नामक व्यक्ती 23 में पासुन येथेच संस्थात्मक विलगीकारणात होता. आज सकाळी हृदय विकारांच्या तीव्र झटक्याने त्याचाही मृत्यु झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ह्या घटनेने प्रशासन हादरले असुन ह्यामागील कारणांचा शोध घेऊन अशा घटना पुन्हा घडू नये ह्याची काळजी आणि त्यावर उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.

Post a Comment

0 Comments