चंद्रपूर रामनगर चे पोलीस उप निरीक्षक जीवन लाकडे त्यांच्यावर प्राणघातक हल्ला
मुख्य आरोपी अमित गुप्ता हा फरार
चंद्रपूर (राज्य रिपोर्टर) : रामनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक जीवन लाकडे यांना अमित गुप्ता नावाचा व्यक्ती आपल्या चारचाकी वाहनातून दारुतस्करी करीत असल्याची माहिती मिळाली. यानुसार लाकडे हे एक पोलीस कर्मचारी आणि सहायक कर्मचाऱ्याला घेऊन शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता डिस्पेन्सरी चौकात गेले. यावेळी अमित गुप्ताला याची भनक लागली आणि त्याने हे वाहन आपल्या घराकडे पळविले. महाकाली चौक परिसरातील त्याच्या घरी पोलीस येऊन धडकले. वाहनाची तपासणी केली असता त्यात देशीदारूच्या चार पेट्या आढळून आल्या. यानंतर पोलिसांनी त्याला पुढील कारवाईसाठी रामनगर पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना लाकडे आणि आरोपी अमित गुप्ता यांच्यात झटापट झाली. यावेळी आरोपीचे आईवडील आणि दोन सहकारी देखील आले. त्यांनी लाकडे यांना मारहाण केली. यात लाकडे यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी अमित गुप्ता हा फरार आहे.आतापर्यत अवैध दारू कोणाच्या आशीर्वादाने कारित होता याची ही चौकशी झाली पाहिजे.



0 Comments