घुग्गुस येथील लाॅयड्स मेटल कंपनीच्या कामगारांना मिळणार संपुर्ण वेतन


घुग्गुस येथील लाॅयड्स मेटल कंपनीच्या कामगारांना मिळणार संपुर्ण वेतन

मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार व चंद्रपुर ले-ऑफ जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांचे सहकार्य लाभल्याने मागण्यापुर्णत्वासले-ऑफ

चंद्रपूर,घुग्गुस(राज्य रिपोर्टर): देशात २५ मार्च ला लाॅकडाउन घोषित करण्यात आले. लाॅक डाउनच्या काळात केंद्र शासना ने कामगारांना पुर्ण वेतन देण्याचे आदेश दिले.
परंतु घुग्गुस येथील लाॅयड्स मेटल कंपनीच्या व्यवस्थापनाने १९ एप्रिल ला कंपनीत "ले-ऑफ" घोषित केले. त्यामुळे या घटनेचा भारतीय लाॅयड्स मेटल कामगार संघ या संघटनेने तिव्र निषेध केला. कामगारांनी वेतन मिळण्यासाठी व्यवस्थापनाशी पत्र-व्यवहार केला. परंतु व्यवस्थापनाशी तिन वेळा झालेली चर्चा निष्फळ ठरली शेवटी संघटनेचे जिल्हा महामंत्री यांनी आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या शी पत्र-व्यवहार केला तेव्हा याची तात्काळ दखल घेत त्यांनी चंद्रपुर जिल्हाअधिकारी यांचे कार्यालयात बैठक लावली व लवकरच तोडगा काढण्यास सांगितले नंतर चंद्रपुर जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार २२ में ला सहा.कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. मध्यस्थीने तोडगा निघाला लाॅक डाउन ते कंपनी सुरु होईपर्यंत स्थायी कामगारांना संपुर्ण वेतनाच्या ५०% वेतन, अस्थायी कामगारांना ७,२५० रुपये प्रती महिना वेतन, सर्व कामगारांना २ जुन पर्यंत देण्यात येनार आहे. त्यामुळे या संघटनेने विदर्भ प्रदेश अध्यक्ष, चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष, महामंत्री, कार्याध्यक्ष व आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार व चंद्रपुर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांचे सहकार्य लाभल्याने कामगारांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments