कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर छोट्या व्यावसायीकांना 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दया, आमदार किशोर जोरगेवार यांची मुख्यमंत्री यांना मागणी


कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर छोट्या व्यावसायीकांना 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दया, आमदार किशोर जोरगेवार यांची मुख्यमंत्री यांना मागणी

चंद्रपूर,(राज्य रिपोर्टर) :  कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा जनजिवनावर मोठा परिणाम झाला आहे. याचा सर्वाधिक फटका छोट्या व्यावसायिकांना बसला असून विशेताः धार्मिक स्थळे, मंगल कार्यालये बंद असल्यामूळे यावर अवलंबुन असलणारे छोटे व्यवसाय पूर्णतः  धबघाईस  आले आहे. त्यामुळे या  व्यवसायाला पुर्वपदावर आनण्यासाठी छोट्या व्यावसायिकांना  कोणत्याही  जाचक अटी न लावता 10 लाख रुपयापर्यंतचे कर्ज देण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाच्या  माध्यमातून केली आहे.

   सध्या संपुर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे. या महामारीची साखळी तोडण्यासाठी जगासह भारतातही संचार बंदी  लागू करण्यात आली आहे. मात्र या संचारबंदीचा मोठा विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेवर पडला आहे. परिणामी देशावर आर्थिक मंदिचे सावट आहे. तसेच या लॉकडाऊनमुळे छोट्या व्यवसायिकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. विशेतः धार्मीक स्थळे बंद असल्याने येथे पूजा साहित्य व ईतर वस्तू विकणा-यांची दुकाने मागील दोन महिण्यांपासून बंद आहे. त्यामूळे या व्यावसायिकासह येथे काम करणारा कामगारही अडचणीत आला आहे. तसेच कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे  भव्य लग्न समारंभही बंद असल्याने मंगलकार्यालये  व लॉन बंद ठेवण्यात आले आहे. याचा मोठा परिणाम कॅट् र्स  व डेकोरेशनच्या  व्यवसायावर पडला आहे. तसेच बॅंन्ड पथक, लग्नासाठी विकल्या जाणारे साहित्य व्यवसायही या लॉकडाऊनमूळे प्रभावित झाला आहे. परिणामी या व्यवसायांवर उदरनिर्वाह  असणा-या कामगारांचाही रोजगार हिरावला गेला आहे.  लग्न समारंभाच्या दिवसातच हे लॉकडाउन करण्यात आल्याने हे व्यवसाय अधिक प्रभावित झाले आहे. विशेतः  हे सिजनेबल व्यवसाय असून वर्षातून एकदा सिजनेबल व्यवसाय करुन त्यावर वर्षभर आपल्या परिवाराचा उदर्निवाह करायचा असा या व्यवसायीकांचा नित्यक्रम राहतो. मात्र यंदा कोरोनामूळे त्यांचे नियोजन बिघडले असून सिजन निमीत्य नविन साहित्य घेण्यासाठी काढलेले कर्ज भेडायचे कसे असा प्रश्न या छोट्या यावसायीकांपूढे पडला आहे. त्यामूळे सर्व  छोट्या व्यवसायीकांचा व्यवसाय पूर्व पथावर आनण्यासाठी कोरोनच्या पाश्वभूमीवर त्यांना कोणत्याही जाचक अटी  न लावता 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. तसे निवेदनही आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे.

Post a Comment

1 Comments