राजुरा नगर पालिका द्वारा दिव्यांगाना अनुदानाचे वाटप
175 दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदान
एकूण 5.66लक्ष रुपये लाभार्थ्यांच्या थेटबँक खात्यात
राजुरा,( राज्य रिपोर्टर) राकेश कलेगुरुवार : राजूरा नगरपालिकेच्या माध्यमातून क्षेत्रातील अंध अपंग मूकबधिर दिव्यांग व्यक्तींना आर्थिक साहाय्य करण्यासाठी राबविलेल्या उपक्रमाअंतर्गत पात्र ठरलेल्या 175 लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचा कार्यक्रम आज दिनांक 27 /5/ 2020 रोजी नगरपरिषद सभागृहात पार पडला या कार्यक्रमाला नगर परिषद चे अध्यक्ष श्री. माननीय अरुण भाऊ धोटे, उपनगराध्यक्ष श्री. सुनील देशपांडे, मुख्याधिकारी अर्शिया जुही मॅडम, विरोधी पक्षनेता श्री. रमेश नळे, श्री. राधेश्याम अडानिया, श्री. हरजीतसिंग संधू सदस्य .पत्रकार बंधू प्रामुख्याने उपस्थित होते .शासनाच्या निकषाप्रमाणे दिव्यांग व्यक्तींसाठी 5 टक्के रक्कम राखून ठेवण्याचा सूचना लक्षात घेऊन राजुरा नगरपरिषदेने या पाच टक्के निधीची तरतूद करून शहरातील दिव्यांगांना योजनेचा लाभ मिळवून दिला आहे सदर निधी कोविड-19 मुळे लाभार्थ्यांच्या थेट खात्या मध्ये आर. टी. जी. एस. द्वारा टाकण्यात येणार आहे. कोवीड-19 च्या पाश्र्वभूमीवर लाकडाऊन असताना सुद्धा नगराध्यक्ष श्री मा.अरुण धोटे यांनी शहरातील अंध अपंगाचे हित लक्षात घेऊन राबवलेल्या या उपक्रमाची प्रशंसा होत आहे.
आज नगरपरिषद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात 1. सौ. मंजुळाबाई किसन उरकुडे. 2.श्री. तुकाराम देवाजी माथनकर 3. श्री. रवी शिवराम सुतार 4. कुमारी शाबीरा शेख इसमाईल 5. शमिमा परवीन मोहम्मद इक्बाल यांना प्रत्येकी 5.000/- पाच हजार रुपयांचा धनादेश मा. नगराध्यक्ष अरुण धोटे. उपनगराध्यक्ष श्री सुनील देशपांडे .मुख्याधिकारी अर्शिया जुई मॅडम. गटनेता श्री.रमेश नळे, श्री. राधेश्याम अडानिया श्री. हरजीत सिंग संधू यांच्या हस्ते देण्यात आला राजुरा नगर परिषद द्वारा राबविण्यात आलेल्या या उपक्रमाअंतर्गत एकूण 175 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ प्राप्त झाला आहे एकूण 5.66 लक्ष रुपये वाटप करण्यात आले आहे सदर कार्यक्रमाचे संचालन व आभार श्री. विजय जांभूळकर यांनी केले या कार्यक्रमाला सहकार्य श्री. अश्विनी कुमार भोई, श्री. प्रीतम खडसे यांनी केले आहे.



0 Comments