एकात्मक बालविकास प्रकल्प चंद्रपूर वतीने जागतिक महिला दिन संपन्न



एकात्मक बालविकास प्रकल्प चंद्रपूर वतीने 
 जागतिक महिला दिन संपन्न 


चंद्रपूर : एकातमक बालविकास  प्रकल्प चंद्रपूर च्या वतीने महीला जागतिक दिन कार्यक्रम 16 मार्चला आनंद बुध्द विहार घुटकाला येथे संपन्न
चंद्रपूर   एकात्मीक बालविकास प्रकल्प चंद्रपूर च्या वतीने जागतिक महिला दिन कार्यक्रम 16 मार्च 2020 ला आनंद बुध्द विहार घुटकाला येथे  घुटकाला सेक्टर क्र. 4 व तुकूम सेक्टर क्रमांक 05 येथील अंगणवाडी सेविका व मदतनिस यांनी मिळून  गृप डॅन्स सादर केले त्याचप्रमाणे घुटकाला येथील सेविका मदतनिसांनी आपआपले गु्रप करून कार्यक्रम मोठ्या उत्साहाने यशस्वी केला त्यात विविध स्पर्धात्मक डॅन्स, गीत, एक अंकी नाटक इत्यादी कार्यक्रम सादर केले त्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी गृप डॅन्स सर्वस्वी उत्स्फुर्तपणे सादर केला. आनंद बुध्दविहाराचे अध्यक्ष सौ. निर्मला पाटील, सौ. उषा नगरकर ए.एन.एम. तसेच पर्यवेक्षीका साधना मेश्राम  तसेच प्रकल्प अधिकारी माननीय श्री. टेटे साहेब यांनी सुध्दा महिला दिनानिमीत्य मोलाचे मार्गदर्शन केले. त्यात अल्का मोडक, वृंदा पुणेकर, विद्या तेलंग,वंदना जिवने, शारदाताई लेनगुरे, सुष्मा राउत, नंदा वैद्य, अनिता रायपुरे, मंगला आंबटकर, सुनिता सुर्यवंशी, विद्या गेडाम, लता साळवे, मेघा उईके, रत्नमाला तराळे, उषा कोवे,यांचे मोलाचे सहकार्य लाभले, तसेच कार्यक्रमाचे संचालन यशोधरा मानके व आभार प्रदर्शन मंदाकिनी बुर्रेवार यांनी मानले व कार्यक्रम यशस्वी करण्यात सहकार्य केले व कार्यक्रम पार पाडण्यात आला.  

Post a Comment

0 Comments