राज्यातील ८ खाजगी लॅबना करोना तपासणी केंद्र म्हणून मान्यता

राज्यातील ८ खाजगी लॅबना
करोना तपासणी केंद्र म्हणून मान्यता
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती
मुंबई, दि. २६ : इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने देशातील २७ खाजगी प्रयोगशाळांना करोना तपासणी केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजे ८ लॅब महाराष्ट्रातील आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. या खाजगी तपासणी केंद्रांना केंद्र शासनाने करोना तपासणी केंद्र म्हणून मान्यता देण्याची शिफारस राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत केंद्र शासनाकडे करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.
थायरोकेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेडनवी मुंबईसबर्बन डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेडमेट्रोपोलीस हेल्थकेअर लिमिटेडमुंबईसर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलनवी मुंबईएस. आर. एल. लिमिटेडमुंबईए.जी. डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेडपुणेकोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल लॅबरोटरीमुंबई आणि इन्फेक्शन लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड, ठाणे या खासगी लॅबचा यात समावेश आहे. यामुळे करोना तपासणी अधिक जलद गतीने होऊ शकेल आणि रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होतील. ही तपासणी केंद्रे पूर्ण क्षमतेने चालविल्यास दररोज एकूण २ हजार संशयित रुग्णांचे नमुने तपासणी करणे शक्य होणार आहे, अशी माहितीही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments