कोरोना च्या उपाय योजनेसाठी बल्लारपुर नगर परिषदेचा पुढाकार : दर्शनी भागात स्वच्छतेसाठी प्रतिबंधात्मक किट ची सोय

कोरोना च्या  उपाय योजनेसाठी बल्लारपुर नगर परिषदेचा पुढाकार : दर्शनी भागात स्वच्छतेसाठी प्रतिबंधात्मक किट ची सोय



दिपक भगत/बल्लारपुर :- सध्या संपूर्ण जगभरात धूमाकूळ घालत असलेला व संपूर्ण जगावर अधिराज्य गाजविलेल्या कोरोना या वायरस मुळे कोणत्याही प्रकारची इजा होवू नये म्हणून बल्लारपुर नगर परिषदेच्या वतीने अनेक प्रकारच्या उपाय योजना करण्यात येत आहे विशेष बाब म्हणजे नागरिकामध्ये कोरोना वायरस चा प्रादुर्भाव होवू नये म्हणून प्रसार माध्यम व सोशल मीडियाच्या माध्यमातुन उपाय योजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे याशिवाय शहरात स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे कार्यालयीन कामाकरिता आलेल्या अधिकारी कर्मचारी व नागरिकांसाठी नगर परिषदेच्या दर्शनी भागात हात धून्यासाठी डेटॉल व नेपकिन ठेवण्यात आली आहे अशाच प्रकारची सोय वसंत वाचनालय येणाऱ्या वाचक वर्गासाठी सुद्धा करण्यात आली आहे याशिवाय कोरोना वायरस ची लागन सामान्य नागरिकांना होवू नये म्हणून नगर परिषद बल्लारपुर च्या वतीने नागरिकांच्या तक्रारी या ईमेल, व्हाट्सएप व अन्य सोशल मीडिया च्या माध्यमातुन करण्याचे आवाहन सुध्दा करण्यात आले तसेच संबंधित अधिकारी वर्गाचे संपर्क क्रमांक सुद्धा सामान्य नागरिकांच्या सोईसाठी स्थानिक प्रशासनाने सोशल मिडियाच्या माध्यमातुन जाहिर करण्यात आले आहे तसेच काळजी न करण्याचे वेळीच सावध राहण्याचे व लक्षणे दिसताच त्वरित उपचार व उपाय योजना करण्याचे आवाहन नगराध्यक्ष हरीश शर्मा, उपाध्यक्ष सौ. मिनाताई चौधरी, मुख्याधिकारी मा. विपिन मुद्दा, व आरोग्य व स्वच्छता सभापति मा. राकेश यादव यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments