चिमुर येथे शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्क्या अनुज्ञप्तीचे शिबीर

महीन्याच्या शेवटच्या बुधवारी चिमुर येथे शिकाऊ अनुज्ञप्ती
व पक्क्या अनुज्ञप्तीचे शिबीर
चंद्रपूर, दि. 13 मार्च : उपप्रादेशिक परीवहन कार्यालय,चंद्रपूर या कार्यालयाच्या वतीने  चिमुर तालुक्यांमध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्क्या अनुज्ञप्तीचे, खाजगी संवर्गातील वाहनांची नोंदणी इत्यादी कामासंदर्भात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या बुधवारी चिमूर येथील शासकीय विश्रामगृह याठिकाणी हे शिबिर असणार आहे.
            इच्छुक अर्जदारांनी www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर  सारथी या सॉफ्टवेअरमध्ये अपॉइंटमेंट घेण्यात यावी. अपॉइंटमेंट नसल्यास ऑनलाइन चाचणी देता येणार नाही याची नोंद घ्यावी. या शिबीराचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर यांनी केले आहे.   

Post a Comment

0 Comments