विषारी औषधीने वीस बकर्यां मरण पावल्या.
वरोरा : तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पारधीबेडा येथील पारधी समाजाच्या
बकरींचा कळप गावालगत असलेल्या दिगांबर तेलमासरे ,सुरेश तेलमासरे, सुधाकर तेलमासरे यांच्या शेतात चरण्यासाठी गेल्या असता शेतातील झाडावर फवारणी केलेल्या विषारी औषधी मुळे विस बकरी चा कळप जागेवर च
मरण पावल्या. त्यामुळे गरीब पारधी समाजात तेलमासरे या शेतकऱ्यांविषयी आक्रोश वाढला असुन नुकसान भरपाई ची मागणी केली आहे.
अजूनही बकरी ची मरणसंख्या वाढत असल्याने पारधीबेडातील कुटुंब हतबल झाले आहे. त्यांनी वरोरा पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.
पारधीबेडा येथील समाजाच्या दहा कुटुंबातील व्यक्तींनी आपआपल्या बकरी चरण्यासाठी १४मार्चला सकाळी गावालगत शेतशिवारात सोडल्या. सकाळपासून ते दुपारपर्यंत बकर्यानी चारा खाल्यावर अचानक त्यांच्या तोंडातुन पांढरा फेस येणे सुरु होऊन
शेतातच तडफडून मरण पावल्या. वामन नन्नावरे यांच्या सात ,राजेश्चर नन्नावरे यांच्या दोन तर वसंत घोसरे ,रमेश घोसरे, अरुण नन्नावरे, गणपत नन्नावरे, अजाब नन्नावरे, अशोक शेरकुरे ,सुभाष शेरकुरे. सुनील शेरकुरे यांच्या प्रत्येकी एक व ईतर व्यक्ती च्या अशा वीस बकरी विषारी औषधीने मरण पावल्या. शेतमालक तेलमासरे बंधू यांनी बकरी मरताना पाहून सुद्धा पारधीबेडा समाजाना कल्पना दिली नाही. काही बकर्यांचा विष ऊतरविण्याचा प्रयत्न पशुवैद्यकीय अधिकारी करीत आहे. एका बकरींची किंमत जवळपास दहा हजाराचे वर असल्याने पारधी कुटुंबातील व्यक्तींचे दोन ते अडीच लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तेलमासरे या शेतकर्यानी गावात कोणत्याही प्रकारची कल्पना न देता शेतात
विषारी औषधे फवारणी करुन बकरींचा जीव
घेतला. बकरींची अनेक पिल्ले आईपासून अलग झाली.काही दिवसांपूर्वी तेलमासरे यांचेच गाय व कालवड विषारी औषधीने मरण पावले असताना सुद्धा पुन्हा त्यांनी विषारी औषधींचा फवारणी साठी वापर केला.
पारधीबेडा समजानी तेलमासरे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मागीतली परंतु त्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्यासाठी टाळाटाळ केल्याने पारधी समाजाने पोलीस स्टेशन गाठून तक्रार केली.पोलिस अधिकारी कोणती कारवाई शेतकऱ्यांवर करणार। याकडे गाववासियांचे लक्ष लागले आहे.
पारधीबेडा येथील घटना.
शेतकऱ्यांकडे नुकसान भरपाईची मागणी.वरोरा : तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पारधीबेडा येथील पारधी समाजाच्या

0 Comments