उपयुक्तता तपासून अभ्यासक्रमाचे रुपांतर करणार - कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक

उपयुक्तता तपासून अभ्यासक्रमाचे रुपांतर करणार
कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक
मुंबईदि. 13 : शिक्षण सोडून  गरजेपोटी नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण द्यावे या हेतूने राज्यात 1988 मध्ये बारावी व्यावसायिक (एच एस सी व्होकेशनल) अभ्यासक्रम सुरु करण्यात आला होते. काळानुरुप या अभ्यासक्रमाची उपयुक्तता तपासून या अभ्यासक्रमाचे रुपांतर करण्यासाठी समिती नेमुन या समितीच्या अहवालानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.
            श्री. मलिक म्हणालेविद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण मिळावे यासाठी सुरु असलेल्या राज्यातील +2 स्तरावरील उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा मिळणारा कमी प्रतिसाद आणि या अभ्यासक्रमाची आजच्या काळात कमी होत चाललेली उपयुक्तता लक्षात घेता समितीच्या अहवालानंतर आवश्यकता वाटाल्यास या  अभ्यासक्रमास खंडीत केले जाईल. मात्र या अभ्यासक्रमासाठी नियुक्त शिक्षकलिपिकभाडारपाल या शिक्षकेतर कर्मचारी यांना सेवेचे संरक्षण देण्यात येईल ,असेही ते म्हणाले.
            या विषयी सदस्य सर्वश्री प्रा. अनिल सोलेडॉ. रणजीत पाटील आदिंनी प्रश्न उपस्थित केला होता.

Post a Comment

0 Comments