आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पानुसार चंद्रपूर व बल्लारपूर शहरात भाजप पदाधिकाऱ्यांनी केले गरजूंना भोजन डबे वितरित
दोन्ही शहरात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी भोजन डब्यांची विशेष व्यवस्था
दोन्ही शहरात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी भोजन डब्यांची विशेष व्यवस्था
बल्लारपूर : कोरोना विषाणू च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी गुढीपाडव्यापासून गरजूंना भाजपतर्फे भोजन पुरविण्यात येईल असे जाहीर केले होते . त्या साठी चंद्रपूर व बल्लारपूर शहरात भाजप पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन करत मोबाईल नंबर्स सुद्धा जाहीर केले होते.
या संकल्पाला आज गुढीपाडव्याला प्रारंभ झाला असून बल्लारपूर शहरात ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल , नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली काशी सिंह, आशिष देवतळे , राजू गुंडेटी आदींनी ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथील रुग्णांना , पोलीस कर्मचाऱ्यांना तसेच गरजू नागरिकांना भोजन डबे वितरित केले.
चंद्रपूर शहरात सुद्धा जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे , उपमहापौर राहुल पावडे , मनपा सदस्य सुभाष कासनगोट्टूवार , डॉ मंगेश गुलवाडे , सूरज पेदुलवार , प्रज्वलंत कडू यांनी विविध भागात गरजूंना भोजन डबे वितरित केले . प्रामुख्याने पोलीस कर्मचाऱ्यांना सकाळ संध्याकाळ 300 डबे , सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे रुग्णांना 250 डबे तसेच शहरात विविध भागात गरजूंना मागणीनुसार भोजन डबे वितरित करण्यात आले.




0 Comments