राज्यात 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन
अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरवि णाऱ्या
दुकाने आणि आस्थापनांना निर्बं धातून सूट
मुंबई, दि. 25 : कोविड 19 (करो ना विषाणू) याचा प्रसार रोखण्या साठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून केंद्र सरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात येत्या 14 एप्रिल 2020 पर्यंत लॉकडाऊन करण्याची अधिसूचना शासनामार्फत जारी करण्यात आली आहे.
या कालावधीत राज्य शासनाचे विभाग आणि कार्यालये आणि सार्वजनिक उपक्रम हे फक्त अत्यावश्यक सेवा देण्यासाठीच कार्यरत राहतील. सर्व शैक्षणिक, प्रशिक्षण, संशोधन आणि मार्गदर्शक संस्था बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणाऱ्या दुकाने आणि आस्थापना यांना पुढील निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.
- पोलीस, होमगार्ड, नागरी संरक्षण दल, अग्निशमन आणि अत्यावश्यक सेवा, आपत्ती व्यवस्थापन आणि कारागृह, मंत्रालय, जिल्हा प्रशासन, लेखा व कोषागार, वीज, पाणी आणि स्वच्छता, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पाणीपुरवठा व स्वच्छता याच्याशी संबंधित कर्मचारी, वाणिज्य दुतावास आणि परकीय संस्थांची कार्यालये, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा आणि अन्न व औषध प्रशासन या कार्यालयांमधील अत्यावश्यक सेवा.
- मंत्रालय, शासकीय कार्यालये तसेच सुरू ठेवण्यात येणारी दुकाने आणि आस्थापना यांनी किमान कर्मचारी वर्ग असण्याची आणि परस्परांपासून किमान अंतर राखण्याची (जसे चेक आऊट काउंटरवर तीन फुटाचे अंतर राखण्यासाठी जमिनीवर खुणा करणे) दक्षता घ्यावी. त्याचबरोबर स्वच्छता राखली जाईल याचीही दक्षता घ्यावी.
- इतर कार्यालये वर्क फ्रॉम होम सुरू ठेवू शकतील. अधिकारी आणि कर्मचारी यांनी आकस्मिक सेवेसाठी ऑन कॉल उपस्थित राहावे.
- अत्यावश्यक आणि नाशवंत वस्तू वगळता अन्य सर्व वस्तूंच्या दळणवळणासाठी राज्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत.
- एसटी महामंडळाच्या बसेस आणि मेट्रो यांसह एका शहरातून दुसऱ्या शहराला जोडणाऱ्या सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा बंद असतील. चालकाव्यतिरिक्त अन्य दोन व्यक्तींसाठी टॅक्सी तर एका प्रवाशासह ऑटोरिक्षा यांना अधिसूचनेत नमूद केलेल्या कारणांसाठी वाहतूक करता येईल. अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी प्रवासी वाहतूक करण्यास अधिसूचनेत मान्यता देण्यात आली आहे. अत्यावश्यक वस्तू, आरोग्यसेवा आणि या अधिसूचनेत नमूद करण्यात आलेल्या बाबी यांकरिता वाहनचालकांव्यतिरिक्त एका व्यक्तीला खासगी वाहन उपयोगात आणता येईल.
- रूग्णालये, औषधालये आणि चष्म्या
ची दुकाने, औषधांचे कारखाने, वि क्रेते आणि वाहतूक. - टेलिकम्युनिकेशन, इंटरनेट, डेटासेवा यांसह माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सेवा.
- शीतगृहे आणि कोठारगृहांची सेवा.
- मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे.
- अत्यावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी आणि वाहतूक.
- शेतमाल आणि अन्य वस्तूंची निर्यात आणि आयात.
- खाद्यपदार्थ, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांसह अत्यावश्यक वस्तूंचे ई-कॉमर्सद्वारे वितरण.
- पेट्रोलपंप, एलपीजी गॅस, ऑईल एजन्सीज त्यांची साठवण आणि त्यांच्याशी संबंधित वाहतूक व्यवस्था
- अत्यावश्यक सेवांकरिता खासगी संस्थांमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सुरक्षा सेवेसह अन्य सेवा देणाऱ्या संस्था.
- टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या सेवा.
- पावसाळ्यापूर्वीची सर्व अत्यावश्यक कामे.
- किमान मनुष्यबळासह बॅंका/ एटीएम, भा
रतीय रिझर्व्ह बँक, फिन्टेक सेवा (स्टॉक एक्सचेंज, क्लीअरींग ऑपरेशन्स, म्युच्युअल फंडस, स्टॉक ब्रोकर्स) अन्य संबंधित सेवा, विमा, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कॅश लॉजिस्टिक आणि कॅश ट्रान्झॅक्शन कंपन्या. - बंदरे आणि त्यावरुन होणारी वाहतूक, मनुष्यबळ, कंटेनर फ्राईट स्टेशनचे कार्यान्वयन, साठवणूक, कस्टम हाऊस एक्सचेंजची कार्यालये, रेल्वेच्या अत्यावश्यक सेवा.
- वीज निर्मिती, वहन आणि वितरण केंद्र आणि सेवा.
- शिधावाटप आणि इतर अत्यावश्यक खाद्य पदार्थांच्या दुकानांसह बेकरी आणि पाळीव प्राण्यांसाठीचे खाद्यपदार्थ आणि पशुवैद्यकीय सेवा.
- व्यावसायिक आस्थापने, कार्यालये, कारखाने, कार्यशाळा,



0 Comments