जीवनावश्यक वस्तू पुरवठ्याबाबतच्या समस्यांसाठी मदत कक्ष पुरवठ्याबाबत अडचण असल्यास तात्काळ संपर्क साधावा

जीवनावश्यक वस्तू पुरवठ्याबाबतच्या समस्यांसाठी मदत कक्ष
पुरवठ्याबाबत अडचण असल्यास तात्काळ संपर्क साधावा
                                     - अन्न व नाग toरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ
मुंबई दि.30: 'कोव्हीड-19आजारासंदर्भात सरकारने जाहीर केलेल्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान नागरीकांना रेशन दुकानावर साहित्य न मिळणेबाजारात वाढीव दराने वस्तूंची विक्री होणे तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत राज्यभरातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयामार्फत मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत तसेच इतर कोणत्याही स्वरुपाच्या समस्या भेडसावत असल्यास नागरीकांना सहाय्य मिळवून देण्यासाठी मंत्री कार्यालय सदैव तत्पर आहे.
तक्रारदारांनी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
श्री.संतोषसिंग परदेशी-खाजगी सचिव-9870336560श्री.अनिल सोनवणे-विशेष कार्य अधिकारी-9766158111श्री.महेंद्र पवार- विशेष कार्य अधिकारी-7588052003श्री.महेश पैठणकर-स्वीय सहाय्यक-7875280965.
        मंत्री कार्यालयामार्फत अशी सुविधा प्रथमच सुरू झाली असून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही सुविधा राबविण्यात येत असल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments