आमदार किशोर जोरगेवार यांच्या माध्यमातून जेवणाची सोय उपलब्ध करून देण्याचे अभियान राबविले



आमदार किशोर जोरगेवार यांच्या माध्यमातून  जेवणाची सोय उपलब्ध करून देण्याचे अभियान राबविले 
आ.किशोर जोरगेवार यांच्या आवाहना नंतर गरजूंच्या मदतीसाठी सामाजिक संस्थाही सरसावल्या

सामाजिक संस्थांच्या माध्यमातून होणार अन्न वाटप - जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत नियोजन

चंद्रपूर - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे गरजूंना मदत म्हणून आमदार किशोर जोरगेवार यांच्या माध्यमातून  जेवणाची सोय उपलब्ध करून देण्याचे अभियान राबविले जात आहे. हे अभियान आणखी विस्तारित करून शेवटच्या गरजू पर्यंत पोहण्यासाठी चंद्रपूरातील सामाजिक संस्थांनी समोर येण्याचे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले होते.  त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत गरजूंच्या मदतीसाठी सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला असून आता सामाजिक संस्थांच्या माध्यमातूनहि गरजूंना अन्न वाटप केल्या जाणार आहे. आज शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांच्या उपस्थितीत अन्न वाटप अभियानाचे नियोजन करण्यात आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, मनपा आयुक्त राजेश मोहिते, महापौर राखी कंचर्लावार, मनपा गट नेते डाॅ. सुरेश महाकूळकर, नगरसेवक विशाल निंबाळकर, यांच्यासह सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

       देशात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यावर उपायोजनाही केल्या जात आहे. संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आले आहे. याचा परिणाम चंद्रपूरातही दिसून येत आहे. संचारबंदीत अडकलेल्या गरजूंना मदत म्हणून  चंद्रपूर विधानसभेचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी गरजू पर्यंत जेवणाचा टिफिन बॉक्स पोहचवायला सुरुवात केली आहे. मात्र हे अभियान आणखी विस्तरीत करण्यासाठी यात सामाजिक संस्थांनी सहयोग करण्याचे आवाहन आ. जोरगेवार यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला शहातातील सामाजिक संस्थांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. शहरातील प्रत्येक गरजू पर्यंत आता सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अन्न पोहचविल्या जाणार आहे. आज शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थित या मोहिमेची रूपरेखा आखण्यात आली आहे. या सर्व संस्थांना जुबली हायस्कुल येथे सामूहिक स्वयंपाकगृह उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येथे स्वयंपाक करून तो वार्डा - वार्डात जाऊन गरजूंना वितरित करण्यात येणार आहे. या स्वयंपाकगुहांमध्ये  कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व उपयोजना केल्या जाणार आहे. या अन्न वाटपाच्या अभियानात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरीयल ट्रस्ट, ज्येष्ठ नागरिक संघ, चांदा जिल्हा संताजी शिक्षण प्रसारक मंडळ, सामाजीक कार्यकर्ते डाॅ. वासलवार, रोटरी क्लब, जेसीस क्लब, विश्व हिंदू परिषद, माहेश्वरी समाज, सेव मेरीट सेव नेशन, एमआयडीसी असोशिएशन, पंजाबी सेवा समीती, जैन सेवा समीती, आदि संस्थांनी स्वर्यपूर्तीन सहभाग घेतला असून ईतरही सामाजीक संस्थेशी आमदार किशोर जोरगेवार  यांच्या कडून सतत संपर्क साधला जात असून त्यांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केल्या जात आहे.

Post a Comment

0 Comments