कला, क्रीडा शिक्षकांच्या नियुक्तीसाठी सर्वंकष धोरण आणणार
- शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू
मुंबई, दि. 13 : राज्यातील शाळांमधील कला, क्रीडा आणि कार्यानुभव शिक्षकांच्या नेमणूकीसाठी सर्वंकष असे धोरण तयार करण्यात येईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.
श्री. कडू म्हणाले, खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक भरती ही ‘पवित्र’ या प्रणाली मार्फत करण्यात येते. संच मान्यतेनुसार रिक्त पदांवर शैक्षणिक संस्थांच्या मागणीनुसार पदभरती करण्यात येतात. आतापर्यंत मागणी केलेल्या 48 क्रीडा शिक्षकांपैकी 15 शिक्षकाची निवड करण्यात आली आहे.
या विषयी सदस्य दत्तात्रय सावंत, नागो गाणार, श्रीकांत देशपांडे, कपिल पाटील आदिंनी प्रश्न उपस्थित केला होता.


0 Comments