कोकणातील विविध कामांचा चव्हाण यांच्याकडून आढावा

कोकणातील विविध कामांचा
चव्हाण यांच्याकडून आढावा

            मुंबईदि. 16 : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज त्यांच्या विभागांतर्गत येणाऱ्या कोकणातील विविध कामांचा आढावा घेतला.
चव्हाण यांनी आज मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कोकण प्रादेशिक विभागाची आढावा बैठक बोलावली होती.
यावेळी श्री. अशोक चव्हाण यांनी धार्मिक स्थळे व स्मारके यांचे नुतनीकरण सुरू असलेल्या सर्व कामांची तातडीने यादी तयार करण्याचे निर्देश दिले. सार्वजनिक बांधकाम विभागात अनेक ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता असल्याच्या मुद्यावरही यावेळी चर्चा झाली. हाजी मलंगपालघर येथील शासकीय विश्रामगृहनियोजन भवनअलिबागपनवेल येथील 100 खाटांचे ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयक्रीडा संकुलकर्जत येथील आश्रमशाळारत्नागिरी जिल्हा न्यायालयमनोर येथील वारली हटपालघर येथील 200 खाटांचे रुग्णालय तसेच निर्माणाधीन असलेल्या इतरही अनेक शासकीय इमारतींच्या कामाचा यावेळी आढावा घेण्यात आला.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सी. पी. जोशीसचिव (बांधकाम) अजित सगणेमुख्य अभियंता पी. के. इंगोलेठाणे जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता आर. टी. पाटीलरायगड जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता आर. एस. पाटीलरत्नागिरी जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता जे. डी. कुलकर्णी यांच्यासह अनेक प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments