कोरोनाच्या सावटाखाली जनता कर्फ्यू ला अभूतपूर्व प्रतिसाद : प्रशासनाची दक्ष भूमिका
दिपक भगत/बल्लारपुर -: कोरोनाच्या सावटाखाली संपूर्ण जग व्यापले असताना जगभरात अनेक लोक मृत्यु मुखी पडले असतांना भारतात या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होवू नये म्हणून भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 22 मार्च ला जनता कर्फ्यू ची अंमलबजावणी करण्याची सूचना केली व या सूचनेला बल्लारपुरकरानी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आहे आज सकाळी 7:00 वाजता पासून सुरु झालेला जनता कर्फ्यू दुपारी 3:00 वाजेपर्यंत आलेल्या सूत्राच्या माहितीनुसार मोठ्याप्रमानावर प्रतिसाद दिला असल्याची माहिती आहे .
या काळात शहरातील बसस्थानक, रेल्वे स्थानक, वस्ती विभागातील गांधी पुतळा परिसर,रेल्वे चौक, जूने बसस्थानक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, तिन एक्का गेट परिसर, कला मंदिर चौक, महात्मा गांधी संकुल, जय भीम चौक, रमाबाई चौक ई परिसरात जनता कर्फ्यू ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आहे. बल्लारपुर करानी जनता कर्फ्यूला भरभरुन सहकार्य केले असल्याचे दिसून आले आहे.
कोरोना वायरसच्या पार्श्वभूमिवर जनता कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी प्रशासनाचे उत्तम सहकार्य मिळत आहे आपल्या जीवाची पर्वा न करता बल्लारपुर शहरातील प्रशासकीय विभागाच्या माध्यमातुन मुख्याधिकारी मा.विपिन मुद्दा यांच्या नेतृत्वात संपूर्ण प्रशासकीय विभाग, संपूर्ण वैद्यकीय विभाग, मा. शिवलाल भगत यांच्या सहकार्या तुन संपूर्ण पोलिस विभाग चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तसेच शहरातील विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातुन कोरोना वायरस विषयी जनजागृती व मॉस्क चे वाटप करण्यात आले आहे.

0 Comments