विद्यार्थ्यांनी जात पडताळणी प्रस्ताव
31 मार्चनंतर सादर करावे : विजय वाकुलकर
चंद्रपूर, दि. 20 मार्च : व्यावसायिक अभ्यासक्रमात सन 2020-21 या शैक्षणिक सत्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी,समिती चंद्रपुर या कार्यालयातर्फे 31 मार्च 2020 पर्यंत ठरविण्यात आलेली होती.
परंतु, कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासकीय कार्यालयामध्ये अभ्यागतांची गर्दी होऊ नये म्हणून प्रस्ताव सादर करण्याकरिता विद्यार्थ्यांनी आपला परिपूर्ण प्रस्ताव सर्व आवश्यक कागदपत्रासह दिनांक 31 मार्च 2020 नंतर सादर करावे. असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर यांनी केलेले आहे.
कोरोना विषाणू बाबत परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर पुन्हा विद्यार्थ्यांना यासंदर्भात कळविण्यात येईल.


0 Comments