तालुका काँग्रेस कार्यालय आरमोरी येथे शिवजयंती साजरी
आरमोरी,( राज्य रिपोर्टर न्युज ) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, थोर राष्ट्रनायक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात जयंती अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली.
यावेळी महाराजांच्या शौर्य, पराक्रम, स्वराज्यनिष्ठा, लोकाभिमुख प्रशासन आणि सर्वसामान्य जनतेप्रती असलेल्या त्यांच्या न्यायप्रिय भूमिकेचा गौरव केला. शिवाजी महाराजांनी उभारलेले स्वराज्य हे केवळ सत्ता नव्हे तर जनतेच्या हक्कांचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
शिवरायांचे विचार आजच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीत अधिकच महत्त्वाचे असून तरुण पिढीने त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्र व समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणे आवश्यक आहे. सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि लोकशाही मूल्ये जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमास तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष मिलींद खोब्रागडे, नगरसेवक माणिक भोयर, नगरसेवक अक्षय बागडे, नगरसेविका मेघाताई मने, नगरसेविका लताताई डोकरे, अनिलजी किरमे, भजनरावजी उसेंडी सर,योगेश चापले,सुगत बांबोळे,ज्योतीताई खोब्रागडे,जोस्तनाताई बांबोळे,हर्षाताई देविकार,उपस्थित होते.
शेवटी ‘जय शिवाजी, जय भवानी’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला आणि शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालण्याचा सामूहिक संकल्प करण्यात आला.







0 Comments