आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या विधानाविरोधात चंद्रपूरात तीव्र निषेध आंदोलन

 


आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या विधानाविरोधात चंद्रपूरात तीव्र निषेध आंदोलन

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्यूज ) : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ  यांनी हिंदवी स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने गांधी चौक, चंद्रपूर येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. हर्षवर्धन सपकाळ  यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

            आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात यावेळी चंद्रपूर शहर महानगर माजी अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, प्रदेश कार्यकारणी निमंत्रीत सदस्य तषार सोम, मनपा गटनेते चंद्रशेखर शेट्टी, रवी गुरुनुले, महामंत्री नामदेव डाहुले, महामंत्री श्याम कनकम, बलराम डोडाणी, विधानसभा अध्यक्ष वंदना हातगावकर, दशरथसिंह ठाकूर, मंडळ अध्यक्ष स्वप्निल डुकरे, दिनकर सोमलकर, नगर सेविका शितल गुरुनुले, ज्याती जिवने, सरला कुळसंगे, अॅड सारिका संदुरकर, आशा देशमूख, मनपा नगर सेवक भालचंद्र दानव, नितेश गवळी,  जितेश कुळमेथे, महिला महामंत्री सायली येरणे, घुग्घुस नगर सेवक आशिष मासिरकर, उमेश आयलु, प्रज्ञा बोरगमवार, मंजुश्री कासनगोट्टूवार, प्रविण गिलबिले, शशिकांत मस्के, चंद्रशेखर देशमूख, करणसिंह बैस, दिपक पाठक, अभिनव कोरकोपुलवार, अंकुश मडावी, अनिष दिक्षित, देवा कुंटा, आशु फुलझेले, रेश्मा पांडे, तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घोषणाबाजी करत सकपाळ यांच्या विधानाचा तीव्र निषेध करण्यात आला.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी “छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून स्वाभिमान, धर्मरक्षण आणि रयतेचे लोकाभिमुख राज्य उभे केले. अशा युगपुरुषाची तुलना परकीय आक्रमक प्रवृत्तीच्या शासकाशी करणे, ही महाराष्ट्राच्या अस्मितेवर आघात करणारी आणि इतिहासाचा अवमान करणारी बाब आहे. महाराष्ट्रातील जनतेला हा अपमान कदापि मान्य नाही असे ते यावेळी म्हणाले.




Post a Comment

0 Comments