गोंडपिंपरी पोलिसांची गोवंश तस्करांविरुद्ध मोठी कारवाई ; दोन आरोपी सह ५०.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

 




गोंडपिंपरी पोलिसांची गोवंश तस्करांविरुद्ध मोठी कारवाई ; दोन आरोपी सह  ५०.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

 ◾५ पिक-अप वाहने जप्त: ४६ गोवंशांची सुटका

◾गडचिरोली येथून तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी गोवंशाची तस्करी 

चंद्रपुर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : गोंडपिंपरी तालुक्यात पोलिसांनी गोवंश तस्करांविरुद्ध मोठी कारवाई करत ५ पिक-अप वाहने जप्त केली असून ४६ गोवंशीय गायी व बैलांची सुटका केली आहे. एकूण ५० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

आज ( दि. २१ फेब्रुवारी २०२६ ) रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजा वढोली येथे नाकाबंदी करण्यात आली. 

गडचिरोली येथून तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सकाळी सुमारे ६.३० वाजता संशयित पिक-अप वाहने दिसताच पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा इशारा केला.

समोरील वाहन थांबवून चालक व सहप्रवाशाची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे मोहसीन अयुब खान ( वय ४०, रा. वाकडी, जि. आसिफाबाद, तेलंगणा ) व मोहम्मद मंजूर अली ( वय ४२, रा. माजीदवाडा, ता. वाकडी, जि. आसिफाबाद, तेलंगणा ) अशी सांगितली. दरम्यान, मागील चार वाहनचालकांनी पोलिसांना पाहताच पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग केला असता वडोली नदीच्या पुलाजवळ वाहने सोडून आरोपी शेतशिवारात पसार झाले.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ५ पिक-अप वाहनांमधून ९ लाख २० हजार रुपये किमतीचे ४६ गोवंशीय जनावरे तसेच ४१ लाख रुपये किमतीची ५ वाहने असा एकूण ५० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी (मुल) सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रमेश हत्तीगोटे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.




Post a Comment

0 Comments