कर्मवीर विद्यालय लाठी येथे बाल संरक्षण कक्ष,चाइल्ड हेल्पलाइन 1098, महिला सक्षमीकरण यांच्या अंतर्गत कार्यक्रम

 



कर्मवीर विद्यालय लाठी येथे बाल संरक्षण कक्ष,चाइल्ड हेल्पलाइन 1098, महिला सक्षमीकरण यांच्या अंतर्गत कार्यक्रम 

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) :  दिनांक. 14/ 2 /2026 ला कर्मवीर विद्यालय गाव लाठी, तालुका. गोंडपिपरी जिल्हा चंद्रपूर येथे जिल्हा महिला बालविकास अधिकारी माननीय मीनाक्षी भस्मे मॅडम यांच्या आदेशान्वये सखी वन स्टॉप सेंटर बाल संरक्षण कक्ष,चाइल्ड हेल्पलाइन 1098,महिला सक्षमीकरण यांच्या अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला.

 कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.एस.ए. वासाडे यांनी केले.  कार्यक्रमाला उपस्थित शिक्षक कु.एल. डी.कडते,श्री. वी.जी सोनटक्के,श्री. पी.एच.  सिरसाम,श्री. एस. पी. मेश्राम,श्री.आर.डब्ल्यू.मेश्राम, श्री.बी.एम. शेरके, श्री.सी. बी.आसुटकर 

 सखी वन स्टॉप सेंटरच्या केसवर्कर राणी खडसे यांनी विद्यार्थ्यांना सखी वन स्टॉप सेंटर चे कार्य व माहिती कौटुंबिक हिंसाचार 181 टोल फ्री हेल्पलाइन चे कार्य समजून सांगितले. तसेच सुपरवायझर प्रणाली इंदुरकर मॅडम यांनी मुलांना 1098 टोल फ्री क्रमांक 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी काय काम करतो व कशा पद्धतीत मुलांना संकटातून मुक्त करता येते व त्यांना संकटकाळीवेळी सहाय्य करता येते यासंदर्भात माहिती दिली तर प्रतिभा मडावी सामाजिक कार्यकर्ता बाल संरक्षण कक्ष यांनी मुलांना सोशल मीडियाचे दुष्परिणाम तसेच बाल संरक्षण कक्षा अंतर्गत येणाऱ्या योजना अनाथ प्रमाणपत्र यासंदर्भात माहिती दिली त्याचप्रमाणे महिला सक्षमीकरण च्या सुनिता पिंपळशेट्टीवार यांनी गाव पातळीवरील महिलांना सक्षम करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व त्याच्यातून कशाप्रकारे लघुउद्योग करता येईल व महिलेला सक्षम करता येईल यासंदर्भात माहिती दिली. 

अशाप्रकारे महिला बालविकास कार्यालय अंतर्गत कार्य करणाऱ्या यंत्रणांची माहिती कर्मवीर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना जनजागृती व मार्गदर्शनातून सांगण्यात आली कार्यक्रमाच्या वेळेस एकूण 150 विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते. मुख्यतः शाळेच्या मुख्याध्यापिका वासाडे मॅडम यांची या कार्यक्रम खूप छान घेतल्या बद्दल विशेष आभार मानले व उत्तम मार्गदर्शन केल्याने त्यांनी धन्यवाद मानले.




Post a Comment

0 Comments